Gurmeet Ram Rahim esakal
देश

Ram Rahim Parole : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर येणार? सत्संगासाठी मागितला पॅरोल

तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमनं पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज केलाय.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : हत्या आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम (Gurmeet Ram Rahim) पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येऊ शकतो.

रोहतकच्या सुनारिया तुरुंगात (Sunaria Jail Rohtak) शिक्षा भोगत असलेला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमनं पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज केलाय. डेरा प्रमुखानं 25 जानेवारीला सत्संगासाठी तुरुंग प्रशासनाला अर्ज पाठवून सिरसा इथं जाण्याची परवानगी मागितलीये.

मात्र, हरियाणा सरकार आणि प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार करत आहे. डेरा सच्चा सौदाचे दुसरे संत शाह सतनाम महाराज यांच्या जन्मदिनी 25 जानेवारीला डेरामध्ये भंडारा आणि सत्संगाचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येऊ शकतो.

विशेष म्हणजे, डेरा प्रमुख राम रहीम 15 ऑक्टोबर 2022 रोजी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. चाळीस दिवस तो बर्नावा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात राहिला. यावेळी त्याच्यासोबत मुलगी हनीप्रीत आणि इतर कुटुंबीयही होतं. राम रहीमनं डेरामध्ये दिवाळी आणि डेरा संस्थापकाची जयंतीही साजरी केली होती. पॅरोलदरम्यान राम रहीमनं ऑनलाइन सत्संगही केला होता. आता पुन्हा एकदा राम रहीमकडून पॅरोलची मागणी करण्यात आलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT