corona virus  esakal
देश

Desh : कोरोना रूग्णसंख्या आणखी घटली

चीनमध्ये कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक झालेला असताना भारतात मात्र मागील एका दिवसात रूग्णांची संख्या केवळ ९३ वर आली आहे

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक झालेला असताना भारतात मात्र मागील एका दिवसात रूग्णांची संख्या केवळ ९३ वर आली आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्के असून मागच्या २४ तासांत एकाही कोरोनाग्रस्ताचा देशात मृत्यू झालेला नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (शनिवारी) सकाळी ८ वाजता जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली.

देशात आतापर्यंत संक्रमित रूग्णसंख्या ४ कोटी ४६ लाख ८२ हजार ५३० तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या एकूण संख्येच्या केवळ ०.०१ टक्के म्हणजे १८४२ वर आली आहे. महामारीने मृत्यू झालेल्यांचा सरकारी आकडा ५ कोटी ३० ७३९ आहे.दैनंदिन संसर्ग दरही केवळ ०.०७ टक्के नोंदविला गेला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.८१ टक्के आहे. भारतात आतापर्यंत एकूण ४,४१,४९,९४९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २२० कोटी ३६ लाख डोस देण्यात आले आहेत.

देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये दैनंदिन रूग्णसंख्या ३० ते ४० लाखांवर पोहोचली होती. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये तर १ कोटींहून जास्त लोक कोरोनाग्रस्त होते. त्यानंतर केंद्र सरकारने लसीकरण मोहीमेला वेग दिला. कोरोनाच्या दोन स्वदेशी लसी तातडीने बाजारात आणल्या गेल्या व लसीकरण मोहीमेलाही त्याच वर्षी सुरवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

SCROLL FOR NEXT