AAP Party News
AAP Party News sakal
देश

AAP Party: दिल्ली विधानसभेत नोट घोटाळा 'आप' आमदाराने नोटांचे बंडल फडकावले

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत आज सलग तिसऱया दिवशी जबरदस्त गदारोळ झाला. त्यातच आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी भर विधानसभेत नोटांचे बंडल फडकावल्याने गोंधळ उडाला.

हे १५ लाख रूपये म्हणजे आपल्याला (भाजप हस्तकाकडून मिळालेल्या) लाचेची रक्कम असल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे यमुनेच्या प्रदूषणावरून गोंधळ घालणाऱया भाजप आमदारांना मार्शलनी अक्षरशः उचलून विधानसभेबाहेर काढले.

गोयल यांच्या या ‘नोटकांडा‘वर हल्ला चढवताना भाजपने आप पक्ष साराच्या सारा बेईमान असल्याचा आरोप केला.

भाजप नेते मनजिंदरसिंग सिरसा म्हणाले, गोयल यांनी आधी लाच घेतली व पोलिसांना ही लाचखोरी कळल्याची कुणकूण लागताच त्यांनी उलट कांगावा सुरू केला.

देशाचे नाव घेऊन सरेआम भ्रष्टाचार करणारे लाचखोर आप ने विधानसभेत- महापालिकेत (एनएमसी) निवडून आणल्याचाही भाजपने आरोप केला आहे.

नोटांचे बंडल फडकावल्यावर गोयल म्हणाले, दिल्ली सरकारच्या बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात परिचारिका व अन्य पदांच्या भरतीसाठी टेंडर काढण्यात आले आहे. ८० टक्के जुन्या कर्मचाऱ्यांना कायम करावे लागते असा शासनाचा नियम आहे. परंतु तसे होत नाही. उलट त्यासाठी लाच मागितली जाते.

येथे मोठ्या प्रमाणात लाचखोरी चालते. काम मिळूनही अनेक कामगारांना पूर्ण पैसे मिळत नाहीत. कंत्राटदार त्यांच्याकडून भरमसाठ पैसे उकळतात. या मुद्द्यावरून या रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेले. पण तिथे त्यांना मारहाण करण्यात आली. कामगारांनी पोलिस आयुक्त, मुख्य सचिव आणि नायब राज्यपालांकडेही तक्रार केली.

पण ठेकेदाराने या गैरप्रकारात आमदारांना सहभागी करून घेण्यासाठी मलाही लाच देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला १५ लाखांची लाख लाचेची रक्कम दिली जात आहे, आणि आपल्याला त्याला रंगेहाथ पकडायचे आहे, असे आपण पोलिस आयुक्तांना कळविले.

परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. ही लाचखोरी उघड करताना आपण जीव धोक्यात घातला आहे. ते लोक इतके दबंग लोक आहेत की ते आपल्याला ठार मारू शकतात. अशी भिती व्यक्त करताना, या लाच घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असीही मागणी आमदार गोयल यांनी केली.

यमुना प्रदूषणावरून गोंधळ

दरम्यान विधानसभेत आज भाजप आमदारांनी यमुनेच्या प्रदूषणावरून प्रचंड गदारोळ केला. भाजप आमदार घोषणाबाजी करत आमदार ‘वेल'मध्ये पोहोचले. आमदार अनिल वाजपेयी आणि ओ पी शर्मा यांना मार्शल्सनी कांद्यावर उचलून सभागृहाबाहेर नेले. त्यानंतर या मुद्द्यावरून भाजप आमदारांनी सभात्याग केला व विधानसभेबाहेर त्यांनी निदर्शने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT