raffic  sakal
देश

Desh : ‘नाटू नाटू’ वाहतुकीचे नियम नका मोडू !

RRR चित्रपटाच्या निर्मात्यांचे अभिनंदन करतानाच रस्त्यावरील लाल सिग्नलचा आदर करा

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : ‘आरआरआर’ या चित्रपटातील लोकप्रिय ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच अमेरिकेत प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. त्यामुळे, हे गाणे पुन्हा चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र या गाण्याचा रस्ते सुरक्षेबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी चतुराईने वापर केला आहे. यासंदर्भातील, ट्विट व्हायरल झाले आहे.

‘आरआरआर’ चित्रपटाच्या निर्मात्यांचे अभिनंदन करतानाच रस्त्यावरील लाल सिग्नलचा आदर करा, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. आरआरआर या नावाचे पूर्णरूप पोलिसांकडून ‘रिस्पेक्ट द रेड लाइट ऑन द रोड’ असे ट्विट करण्यात आले आहे. ‘गोल्डन ग्लोब रस्ता सुरक्षेसाठी नामांकन : #नाटू कधी लाल सिग्नल ओलांडू नका, #नाटू कधी तिबलसीट वाहन चालवू नका, #नाटू कधी मद्यपान करून वाहन चालवू नका, #नाटू कधीही वाहतुकीचे नियम तोडू नका. सर्वोत्तम गाण्याचा गोल्डन ग्लोब २०२३ पुरस्कार जिंकल्याबद्दल ‘आरआरआर’ चा निर्मात्यांचे अभिनंदन’, असे ट्विट उत्तर प्रदेश पोलिसांनी केले आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या या अनोख्या, जनजागृतीपर ट्विटला नेटकऱ्यांनीही पसंती दिली. ते सुमारे ७१ हजारपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले असून १,१२५ जणांनी लाईक केले. ‘नाटू नाटू’ गाणे म्हणणाऱ्या राहुल सिपलीगंज या गायकानेही या गाण्याचा रस्ता सुरक्षेसाठी वापर केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांचे आभार मानले आहेत. भारतीय चित्रपटाला या गाण्यामुळे प्रथमच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागासारख्या दिग्गज गायिकांना मागे टाकत या गाण्याने हा बहुमान मिळविला आहे.

‘नाटू नाटू’ गाण्याचा वापर आम्ही रस्ते सुरक्षेविषयी जागृती करण्यासाठी केला आहे. या गाण्यामुळे रस्ता सुरक्षा मोहिमेबद्दल आकर्षक घोषवाक्य तयार करण्यात मदत झाली. रस्ता सुरक्षेबरोबरच महिला सुरक्षितता व इतर मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी आम्ही बॉलीवूडमधील लोकप्रिय गाण्यांचाही वापर करतो.

- राहुल श्रीवास्तव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT