kumbh 
देश

'प्रयागराज त्रिवेणी संगमासारखे इतर कोणतेही तिर्थक्षेत्र नाही'

पी. बी. सिंह

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या 'महाकुंभ 2019'मध्ये दररोज विविध महंतांचे प्रवचन आयोजित केले जाते. नाग वासुकी परिसरात सुरू असलेल्या पाठाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. 20) देवकीनंदन ठाकुर यांनी सांगितले की, कृष्णाच्या समान इतर कोणतीही देवता नाही व गंगेसमान इतर कोणतीही नदी नाही, तर या त्रिवेणी संगमासारखे दुसरे तीर्थक्षेत्र नाही. देवाचं भक्ताशी नातं हा प्रेम व आस्थेचा विषय आहे. प्रेमामुळेच गोपिका व मीरा कृष्णमय झाल्या होत्या. त्यामुळे देवाकडे कोणत्याच प्रकारचा भेदभाव नसतो, असे ठाकूर यांनी सांगितले.  

संत मोरारी बापू यांनी मानस संगम कथेच्या दुसऱ्य़ा दिवशी सांगितले की, या तिर्थक्षेत्री जो भक्तीभाव मनात ठेवून येईल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या महाकुंभात अर्थ, धर्म, काम व मोक्ष या सगळ्याची द्वारे खुली असतात. कौटुंबिक कलहाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच कलह होऊ नये यासाठी त्यांनी उपाय सांगितले. पती-पत्नीमधील नात्याबद्दलही त्यांनी मत व्यक्त केले. पती-पत्नीने अहंकार सोडून सहजतेने एकमेकांना स्विकारायला हवे, असे सांगितले. तसेच मोरारी बापू यांनी व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला.

माघी पौर्णिमेदिवशी जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर उमाकांत आनंद सरस्वती यांनी कुंभनगरात प्रवेश केला. त्यांच्या शिबिरात असलेली शिवाची मूर्ती ही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. तसेच या शिबिरात रूद्राभिषेक कार्यक्रमही पार पडला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT