development accelerated during Prime Minister Narendra Modi tenure J P Nadda politics esakal
देश

JP Nadda : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात विकासाची गती वाढली; जे. पी. नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हातात घेतल्यानंतर देशाच्या विकासाचा वेग वाढल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नड्डा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केली. डॉ. सिंग यांच्या काळात देशाची स्थिती चांगली नव्हती. एवढेच नव्हे तर भ्रष्टाचार करणारा देश अशी प्रतिमा या काळात निर्माण झाली होती. परंतु नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशाची जगातील प्रतिमा सुधारली असून जगात भारत एक शक्तीशाली देश व जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणारा देश म्हणून ओळख निर्माण झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

सर्व समाजाची प्रगती

पंतप्रधान मोदी यांच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी समाजातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे. उच्च शिक्षणामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मागासवर्गीयांच्या विकासासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना केली आहे.

भटक्या विमुक्त जमातींच्या विकासासाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली आहे. महिलांच्या हक्कासाठी विविध योजना केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकासाठी मोदी सरकारने योजना करून सर्व समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केल्याचा दावा नड्डा यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT