Eknath Khadse on Devendra Fadnavis  
देश

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, जो कोणी भाजपमध्ये येईल...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कामावर विश्वास ठेवून जो कोणी भाजपमध्ये येईल, त्यांचे स्वागत असेल,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेसुद्धा महायुतीला साथ देतील, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

महायुतीतील समावेशाबाबत ‘मनसे’बरोबर काही दिवसांपूर्वी चर्चा झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ‘‘मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला, तेव्हापासून त्यांच्याशी जवळीक वाढलेली आहे. राज ठाकरे असे पहिले व्यक्ती आहे की ज्यांनी मोदी पंतप्रधान झाले पाहिजे अशी जाहीर भूमिका घेतली होती. मधल्या काळात त्यांची भूमिका बदलली होती. मात्र, मागील दहा वर्षांत ज्या पद्धतीने नवीन भारताची निर्मिती झाली आहे, ते राज यांनाही मान्य असेल. जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत, अशा लोकांनी मोदीजीसोबत राहिले पाहिजे. राज ठाकरे यांचा पक्ष महायुती सोबत राहील असा विश्वास आहे,’’ असे फडणवीस म्हणाले.

भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये परतण्याची इच्छा आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘खडसे यांनी अजून अधिकृतरीत्या कळविलेले नाही. मात्र ज्यावेळेस इकडे येतील त्यांचे आम्ही स्वागतच करू. मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणीही भाजपत प्रवेश करीत असेल त्याचे स्वागतच असेल.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या मतांमध्ये अधिक वाढ होईल, असेही फडणवीस म्हणाले.

बारामतीतून सुनेत्रा पवार निवडून आल्या तर त्या पंतप्रधान मोदी यांच्याकरिता हात उंच करतील. सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्या राहुल गांधींसाठी हात वर करतील. आता काही लोकांना समजून घ्यायचे नाही, त्याला मी काहीच करू शकत नाही.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT