Gold Donation
Gold Donation  ANI
देश

तिरूपतीला भक्ताकडून सोन्याचे पंजे, किंमत ऐकून बसेल धक्का

सकाळ डिजिटल टीम

तिरुपती : मनातील इच्छा किंवा नवस पूर्ण झाल्यानंतर आपण अनेक मंदिरांमध्ये भक्तांकडून मोठ्याप्रमाणात दान केल्याचे आपण पाहिले अथवा वाचले असेल. यापूर्वीदेखील अनेक भक्तांकडून तिरूपती मंदिरात आणि महाराष्ट्रातील शिर्डीच्या साई मंदिरात सोनं, चांदी आदींचे दान करण्यात आले आहे. अशाच प्रकारे शुक्रवारी एका भक्ताने सोने, हिरे आणि माणिकांनी जडवलेल्या 'वरदा-कटी हस्तां' (Varada-Kati Hastas) ची जोडी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दान केली आहे. या दागिन्यांचे वजन सुमारे 5.3 किलो असून त्यांची किंमत सुमारे 3 कोटी रुपये इतकी आहे. (A pair of 'Varada-Kati Hastas', made of gold donated Tirumala by a devotee.)

याबाबत मिळालेल्या माहितानुसार, दान करण्यात आलेला भक्त गेल्या 50 वर्षांपासून तिरुमला मंदिरात भगवान व्यंकटेश्वराची पूजा करत आहेत. गेल्या वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उत्तम आरोग्यासाठी त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरात नवस केला, जो पूर्ण झाल्यामुळे त्यांनी हे दान केल्याचे केले आहे.

दरवर्षी येतात लाखो भाविक

तिरुपती मंदिरात अनेकदा सोन्याचा प्रसाद चढवला जातो. त्यामुळेच हे मंदिर देणगीच्या बाबतीत भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. दरवर्षी लाखो लोक तिरुमला डोंगरावर वसलेल्या या मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: लाल किल्ल्यावरून सांगतो त्यांची प्रतिष्ठा वाढलीच पाहिजे.. अदानी अंबानीवर विचारलेल्या प्रश्नावर मोदींचे छातीठोक उत्तर

Chandu Champion : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर; चित्रपटातील 'त्या' सीनचं सिक्रेट कार्तिकने केलं उघड

Instagram Post Delete : इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस एका क्लिकमध्ये डिलीट करायच्या आहेत? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 'शिवप्रतिष्ठान'कडून कॅफेची तोडफोड

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर दाखल

SCROLL FOR NEXT