Ram Navami 2024 Esakal
देश

Ram Navami 2024 : अयोध्येत रामनवमीचा उत्साह; शरयू नदीवर भाविकांची मोठी गर्दी, 12:16 वाजता होणार सूर्य तिलक

Ram Navami 2024 : देशभरात रामनवमीचा उत्साह देशभरात दिसून येत आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज रामनवमी साजरी होत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरात रामनवमीचा उत्साह देशभरात दिसून येत आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज रामनवमी साजरी होत आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच राम मंदिर परिसरात भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. तसेच शरयू नदीवर रामभक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येत प्रथमच रामनवमी साजरी होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत आहेत. अशा परिस्थितीत दर्शनाच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. याशिवाय दर्शनाची वेळही वाढवण्यात आली आहे. आज सर्वांच्या नजरा सूर्य टिलकांकडे लागल्या आहेत. दुपारी 12:16 वाजता सूर्य टिळक होईल.

रामनगरीमध्ये आज भगवान श्रीरामाची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. रामजन्मभूमी परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे. सुंदर रोषणाई हे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. भाविकांच्या सोयीसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. शूज आणि चप्पल ठेवण्याबरोबरच पिण्याचे शुद्ध पाणी आणि भाविकांच्या मूलभूत सुविधांचीही काळजी घेण्यात आली आहे. आज अयोध्येला दररोज पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी पोहोचतील अशी अपेक्षा आहे. दुपारी 12 वाजता रामलल्लाची जयंती उत्साहात साजरी केली जाईल. श्रीरामाच्या जयंतीनिमित्त सूर्यदेव प्रभू रामाचा टिलक करणार आहेत.

शरयू नदीत स्नान करुन रामभक्त रामल्लाचे दर्शन घेत आहेत. रामनवमीनिमित्त अयोध्येत आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. राम की पैडी, रामकोट, सरयू बीच, धरमपथ, रामपथसह रामजन्मभूमी संकुलात पुष्पवृष्टी करून रामनवमी साजरी केली जाणार आहे.

प्रभू श्रीरामांचा ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. अयोध्येत दाखल होणाऱ्या सर्व रामभक्तांसाठी योग्य त्या सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आज प्रभू श्रीरामाच्या कपाळावर जेव्हा सूर्याची किरणे पडतील, तेव्हा सुवर्ण वातावरणात प्रभूरामाचा राजतिलक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT