Dhiraj Sahu esakal
देश

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या अडचणींमध्ये वाढ; ३० कपाटांमध्ये सापडले ३०० कोटी रुपये

सकाळ वृत्तसेवा

पाटणाः काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित ‘बौध डिस्टिलरी बिझनेस ग्रुप’च्या ओडिशा व झारखंड येथील ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाचे छापासत्र शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू होते. तीन दिवसांपासून नोटांची मोजणी सुरू असून आतापर्यंत ३०० कोटींपेक्षा जास्त रकमेची मोजणी झाली आहे.

ओडिशातील प्राप्तीकर विभागाच्या संशोधन शाखेने बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (बीडीपीएल) समूहाशी संबंधित कंपन्यांच्या ठिकाणांवर पाच डिसेंबरला सकाळी छापा घातला. प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी ‘बीडीपीएल’च्या ओडिशा आणि रांचीतील सर्व ठिकाणांवर छापे घातले.

छापासत्रात ३० कपाटांमध्ये साठवलेल्या नोटा मिळाल्या आहेत. स्टेट बँकेच्या छोट्या यंत्रांच्या साह्याने नोटांची मोजणी सुरू झाली होती. यंत्रांची क्षमता कमी असल्याने पहिल्याच दिवशी मोजणी थांबवावी लागली. दुसरीकडून मोठी यंत्र आणल्यानंतर कालपासून पुन्हा नोटा मोजणी सुरू झाली.

आणखी काही ठिकाणी छापे

प्राप्तीकर विभागाने ओडिशातील काही नव्या ठिकाणीही छापे घातले. तेथे अनेक बॅगांमध्ये ठेवलेल्या नोट्या सापडल्या. त्यांची मोजणीही सुरू आहे. छापासत्रात पहिल्या दिवशी कपाटांतील नोटा पाहून सुमारे ३०० कोटी रुपये असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. पण नव्या ठिकाणांहून आणखी नोटा सापडल्याने आतापर्यंत ४०० कोटींपेक्षा जास्त रुपये मिळाल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT