diamond trader from surat gujarat dilipkumar v lakhi Donated 101 kg gold to ayodhya ram mandir  
देश

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केलं 101 किलो सोनं! सुरतमधील 'हा' व्यापारी आहे तरी कोण?

अयोध्या येथील राम मंदिरात आज(22 जानेवारी) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अगदी काही तासांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.

रोहित कणसे

अयोध्या येथील राम मंदिरात आज(22 जानेवारी) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अगदी काही तासांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी जगभरातून राम मंदिरासाठी दान दिलं जात आहे. जगभरातील रामभक्त आपल्या क्षमतेनुसार राम मंदिरासाठी दान करत आहेत. यादरम्यान सुरत येथील एका हिरे व्यापाऱ्याने 101 किलोग्रॅम सोनं दान केल्याची माहिती समोर आळी आहे. राम मंदिराला आतापर्यंत 5000 कोटींहून अधिक दान मिळाले असल्याचे सांगितले जात आहे. (Ram Mandir Pran Pratishtha)

कोण दिलं 101 किलो सोनं?

गुजरातच्या सुरत शहरातील एक व्यापारी दिलीप कुमार व्ही. लाखी यांनी राम मंदिरासाठी 101 किलो सोने दान केले आहे. दिलीप कुमार व्ही. लाखी हे सुरतमधील बड्या हिऱ्यांच्या फॅक्टरीजपैकी एकाचे मालक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रभू श्रीराम मंदिराला बसवण्यात आलेल्या 14 सुवर्ण दरवाज्यांसाठ दिलीप कुमार व्ही. लाखी यांनी 101 किलोग्रॅम सोने दिले आहे. हे आजवर श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला मिळालेलं सर्वात मोठं दान असल्याचे सांगितलं जात आहे.

सोन्याचं करणार काय?

प्रभू रामाच्या भव्य मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू आणि खांबांवर या सोन्याचा वापर केला जाणार आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासोबतच मंदिराच्या तळमजल्यावर 14 सुवर्णद्वार बसविण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत राम मंदिरासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देणगी कथाकार मोरारी बापूंच्या अनुयायांनी दिली आहे. त्यांनी राम मंदिरासाठी 16.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याशिवाय सुरतचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी राम मंदिरासाठी 11 कोटी रुपये दिले आहेत. गोविंदभाई ढोलकिया हे श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्सचे संस्थापक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मार्चपर्यंत राम मंदिरासाठी 3 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त दान मिळाले होते. जे आता पाच हजार कोटींहून अधिक झाली आहे. मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. राम मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत आणखी 300 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT