Homi J. Bhabha
Homi J. Bhabha sakal
देश

Death Mystery: होमी भाभांच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात होता?

सकाळ डिजिटल टीम

भारतात अशा अनेक मोठ्या, विद्वान लोकांचा मृत्यू झालाय की त्यांच्या मृत्यूमागील गूढ आजही कायम आहे. मग ते राजकीय नेते मंडळीचे मृत्यू असो की सिनेतारकांचे...त्यांच्या मृत्यू कसा झाला हे आजही पडद्यामागेच आहे.. आम्ही अशाच प्रसिद्ध लोकांच्या मृत्यूंचा आढावा घेतोय.. आज आम्ही तुम्हाला होमी जहांगीर भाभा यांच्या रहस्यमय मृत्यूबाबत सांगणार आहोत..

होमी जहांगीर भाभा (Homi Jehangir Bhabha) यांना भारताच्या न्यूक्लियर प्रोग्राम (Nuclear Programme) चे जनक समजले जाते. सन 1966 मध्ये त्यांचा एक विमान अपघातात (plane crash) मृत्यू झाला पण यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले.. त्यातला एक प्रश्न होता की होमी जहांगीर भाभा यांच्या मृत्यू मागे अमेरिकेचा तर हात नव्हता? (Did America CIA kill Dr Homi Bhabha? Death mystery of India's nuclear pioneer)

आज त्यांच्या मृत्यूला ५६ वर्ष झाले तरी त्यांच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात होता, असं आजही बोलले जाते.. तुम्हाला वाटेल की यामागचे कारण काय? असं म्हणतात की जर होमी जहांगीर भाभा यांचा त्यावेळी प्लेन क्रॅश मध्ये मृत्यू झाला नसता तर एनर्जीच्या क्षेत्रात भारताने महारत कमावलं असतं आणि न्यूक्लियर सायंस (Nuclear Science) च्या क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असत्या.

खरचं होमी जहांगीर भाभा यांच्या मृत्यूमागे षडयंत्र होते?

अस म्हणतात की भारताच्या न्यूक्लियर एनर्जी प्रोग्रामला थांबवण्यासाठी भाभा यांच्या मृत्यूचे षडयंत्र रचले होते. भाभा यांचा मृत्यू एका विमान अपघातात झाला. पण म्हटलं जातं की हा विमान अपघात जाणूनबुजून करण्यात आला. अमेरिकेला भारत न्यूक्लियर प्रोग्राम समोर जावा असे मनोमनी वाटत नव्हते. त्यामुळे अमेरिकेच्या गुप्त एजेंसी सीआए(CIA) नी होमी जहांगीर भाभा ज्या विमानाने जात होते त्या विमानाला क्रॅश केले पण यामागे खरंच अमेरिकेचा हात होता, हे अद्याप सिद्ध केले गेले नाही.

सीआईएचे ऑफिसर यांनी भाभा यांचा मृत्यू एक षडयंत्र असल्याचे मानले होते

होमी जहांगीर भाभा यांच्या रहस्यमय मृत्यूची एक थेरी 2008 मध्ये आली होती. 2008 मध्ये एका वेबसाइटने एक पत्रकार ग्रेगरी डगलस आणि सीआए ऑफीसर रॉबर्ट क्राओली यांच्यात झालेली बातचीत छापली होती. या बातचीतमध्ये क्राओली म्हणाले की भारताने 60 व्यां दशकात अणुबॉम्ब बनविणे सुरू केले होते. जी आमच्यासाठी एक समस्या होती. रॉबर्ट नुसार भारत हे सर्व रशियाच्या म्हणण्यानुसार करत होता.

या बातचीतमध्ये रॉबर्ट क्राओली ने भाभा यांना धोकादायक सांगितले होते. क्राओलीच्या मते भाभा ज्या कारणासाठी व्हियेना जात होते त्यामुळे समस्या आणखी वाढली असती त्यामुळे असं म्हणतात की याच कारणाने त्यांचा विमान अपघात करविण्यात आला.

मृत्यूपूर्वी भाभा यांनी 18 महीन्यात अणुबॉम्ब बनविण्याची घोषणा केली होती.

अस म्हणतात की ऑक्टोबर 1965 मध्ये भाभा यांनी ऑल इंडिया रेडियोवरुन घोषणा केली होती की त्यांना जर सूट मिळाली तर भारत 18 महिन्यात अणुबॉम्ब बनवून दाखवेल.

भाभा यांच्या मते देशाच्या सुरक्षेसाठी अणुबॉम्ब बनविणे आवश्यक होते. असं म्हणतात की त्यावेळी भारताच्या विकासाला पाहून अमेरिका घाबरला. अमेरिकेला असं वाटलं की भारताने अणुबॉम्ब बनविले तर भारत जगात एक महासत्ता म्हणून नावारुपास येईल जे आपल्यासाठी अधिक आव्हानात्मक ठरेल त्यामुळे सीआईएने भारताच्या न्यूक्लियर प्रोग्रामला थांबविण्यासाठी भाभा यांच्या हत्येचे षडयंत्र रचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT