Digambar Kamat Team eSakal
देश

"गोव्यात भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी सर्व पर्यायांवर विचार सुरु"

काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी हे स्पष्ट केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Goa : गोव्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करण्यास तयार असल्याचं काँग्रेसनं (Congress) शुक्रवारी स्पष्ट केलं. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 20 जागा जिंकणाऱ्या आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार आणि तीन अपक्षांचा पाठिंबा मिळवला असला तरी, भाजपने अजूनही सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, भाजप (BJP) सत्तेसाठी दावा करत नाही, याचा अर्थ भाजपमध्ये अंतर्गत दुही असल्याचं हे लक्षण आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेसला 11 जागा मिळाल्या होत्या. गोव्यात बिगर-भाजप सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस सर्व पर्यायांचा विचार करत असल्याचं कामत यांनी स्पष्ट केलं आहे. कामत म्हणाले, "भाजपला 33.31 टक्के मते मिळाली आहे, यावरून हा जनादेश स्पष्टपणे सत्ताधारी सरकारच्या विरोधात होता, हे स्पष्ट होतं. यावरून 66.69 टक्के मतदारांना भाजप नको असल्याचं स्पष्ट होतं. भाजप नेतृत्व केवळ वेळ वाया घालवत आहे असंही ते पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT