Digging grave for stillborn people find another girl buried at uttar pradesh 
देश

हंड्यामध्ये चिमुकलीला ठेवून खड्ड्यात पुरले पण...

वृत्तसंस्था

बरेली (उत्तर प्रदेश) : 'देव तारी त्याला कोण मारी...' या म्हणीचा प्रत्यय येथे आला आहे. एक पिता आपल्या मृत झालेल्या चिमुकलीला दफन करण्यासाठी खड्डा खोदत असताना अचानक खड्यामध्ये हंडा सापडला. मातीने गाडलेल्या खड्ड्यामधील हंड्यात जिवंत चिमुकली आढळून आली.

उत्तर प्रदेशात एक जादुई घटना घडल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मातीने गाडलेल्या खड्ड्यामध्ये चिमुकली जीवंत आढळल्यामुळे त्या चिमुकलीचे दैव बलवत्तर या बरोबरच ही जादुई घटना असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

सविस्तर माहिती अशी, 'एका नवजात चिमुकलीचा अचानक मृत्यू झाला. चिमुकलीच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःख पसरले. पिता जड अंतकरणाने चिमुकलीचा मृतदेह दफन करण्यासाठी स्मशान भूमित गेला. चिमुकलीला दफन करण्यासाठी खड्डा खोदत होता. खड्ड्यामध्ये अचानक एक हंडा सापडला. धक्कादायक म्हणजे या हंड्यात जिवंत पुरलेली मुलगी सापडली. आपली चिमुकली गेली असताना या मुलीच्या रूपात देवानेच आपल्याला हे कन्यारत्न भेट दिले, असे समजून पित्याने या मुलीचा स्वीकार केला.'

पोलिस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी सांगितले की, 'बरेली शहरातील सीबीगंज येथील वेस्टर्न कॉलनी येथील रहिवासी हितेश कुमार सिरोही यांच्या घरी गुरुवारी (ता. 10) एका मुलीचा जन्म झाला होता. मात्र, या मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांसह तिचे वडील अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला स्मशानात घेऊन गेले. मृतदेह पुरण्यासाठी त्यांनी सुमारे तीन फूट खोल खड्डा खणला. त्यादरम्यान खड्डा खोदत असलेल्या कामगाराच्या खोऱयाला एक हंडा लागला. हंडा बाहेर काढला असताना त्यात एक जिवंत नवजात मुलगी सापडली. बराच वेळ जमिनीखाली राहिल्याने तिचे श्वसन वेगात सुरू होते. हितेश याने या मुलीचा स्वीकार केला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे कोणी या मुलीला जीवंत पुरले याचा शोध घेतला जात असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे वजन 1.1 किलो आहे. तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तिची प्रकृती सुधारत आहे. काही तासांपूर्वीच तिला जमिनीमध्ये पुरले असावे, असे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT