Uttarkashi Tunnel Rescue Esakal
देश

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यातील खोदकाम गेल्या १६ तासांपासून थांबलं, आता घेणार ड्रोनची मदत

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बचावकार्य पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.मात्र अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. गेल्या १२ दिवसांपासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पण, बचावकार्य पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.

बचावकार्य सुरू असतानाच खोदकाम करणाऱ्या ऑगर मशिनमध्ये मशिनमधील बिघाड झाला होता. ही समस्या सोडविण्याचे काम काल(गुरूवारी) रात्रभर सुरू होते. या समस्येमुळे गेल्या 15 ते 16 तासांपासून खोदकामाचे काम होऊ शकले नाही. काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, आता बचावकार्यावेळी बोगद्याच्या आतमध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, जेणेकरून बोगद्याच्या आतमध्ये बचाव कार्यादरम्यान कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याचा आधीच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी सतत चर्चा करण्यात येत असून त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत.

बचावकार्य अंतिम टप्प्यात

काल गुरुवारी मशीन खराब झाल्यानंतर देश-विदेशातून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांनी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य अंतिम टप्प्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT