Uttar Pradesh By Election esakal
देश

Uttar Pradesh By Election: 'माझी डिंपल जिंकणार'! पतीदेव अखिलेश यांचा दावा

मैनपूरी लोकसभा निवडणूकीची चर्चा सुरु असताना त्यात समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचे नाव चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

UP By Poll Results: देशामध्ये आज सगळीकडे वेगवेगळया निवडणूकांच्या निकालाचे वारे आहे. गुजरात विधानसभा निवडणूक, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक यांचे आज निकाल आहेत. यासगळ्यात उत्तर प्रदेशातील बाय पोल निकालाची देखील चर्चा आहे.

मैनपूरी लोकसभा निवडणूकीची चर्चा सुरु असताना त्यात समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचे नाव चर्चेत आहे. त्या आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या वेगानं विजयाच्या दिशेनं घोडदौड करताना दिसत आहे. काहीही झालं तरी पत्नी डिंपल या विजयी होणार असा दावा अखिलेश यांनी केला असून ते आता लखनऊ वरुन मैनपुरीला रवाना झाले आहेत. दुपारी बारापर्यत हाती आलेल्या माहितीनुसार डिंपल यांनी ७८ हजार मतांनी आघाडी घेतली होती.

सपानं आता दावा केली आहे की, डिंपल यांच्या निमित्तानं यंदा पक्षाला ऐतिहासिक विजय मिळणार आहे. प्रशासनानं आमच्या पक्षाला जास्तीत जास्त लक्ष्य केले होते. त्याचा फटका आम्हाला बसेल याची भीती आहे. मात्र तसे झाले नसते तर आम्ही आणखी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली कामगिरी केली असते असे यादव यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

जेव्हा मैनपूरीमधून डिंपल लढणार असे सांगितले जाऊ लागले तेव्हापासून अनेकांनी त्यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली होती. पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त होती. त्यामुळे बीजेपीला पहिल्यांदाच मोठी संधी यानिमित्तानं मिळाली होती. यावेळी बीजेपीनं मुलायम सिंग यांचे जवळचे नातेवाईक रघुराज सिंह शाक्य यांना मैदानात आणले होते. मात्र आता डिंपल यांचा प्रभाव जोरात असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT