SP Jananathan 
देश

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक एस. पी. जननथन काळाच्या पडद्याआड

सकाळवृत्तसेवा

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक एस. पी. जननथन (SP Jananathan)  यांचं निधन झालं आहे. ते ६१ वर्षांचे होते. रविवारी सकाळी १० वाजता त्यांनी चेन्नईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  एस.पी. जननथन यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिग्दर्शक अरुमुगकुमार यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. एस.पी. जननथन यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ओपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

"आपले दिग्दर्शक एस.पी. जननथन सर, यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर ओपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो", असं ट्विट दिग्दर्शक अरुमुगकुमार यांनी केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एस.पी. जननथन हे त्यांच्या घराबाहेर बेशुद्धावस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  यावेळी प्रकृती खालवल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरदेखील ठेवण्यात आलं होतं. मात्र, अखेर त्यांचं निधन झालं आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT