india alliance 
देश

पंतप्रधानपद नव्हे, तर या मुद्दावरून 'इंडिया' आघाडीत मतभेद; ममता, स्टॅलिन, नितीश कुमार नाराज?

रवींद्र देशमुख

मुंबई - मुंबईत विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक नुकतीच पार पडली आहे. मात्र या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरून मतभेद निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षाकडून देखील हाच धागा पकडून टीका करण्यात येत आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसाठी ममता बॅनर्जी गैरहजर होत्या. त्यामुळे नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. संयोजकपद काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाला द्यावं असं ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन आणि नितीश कुमार यांचं मत आहे. मात्र काँग्रेस संयोजक म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर ठाम आहे.

ममता बॅनर्जी या बैठकीनंतर नाराज होऊन पत्रकार परिषदेला उपस्थित न राहता निघून गेल्या. शिवाय आघाडीचं काम धिम्या गतीने जात असल्याचं देखील ममता बॅनर्जी यांनी बैठकीत बोलून दाखवल्याचं समजतं.

आम्ही नाराज आहोत. अशा पद्धतीच्या बैठका घेवून काहीही होणार नाही. लढण्याची तयारी दिसत नाही, असं सांगत, ममता बॅनर्जी निघून गेल्या. तसेच त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांना देखील थांबू दिलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT