Fifth Accused Injured in Encounter and Arrested in Disha Patani house firing Case

 

esakal

Premier

Disha Patani house firing : पाचवा आरोपी एन्काउंटरमध्ये जखमी; पोलिसांना गयावया करत म्हणू लागला...

Disha Patani house firing accused encounter: पोलिसांनी या आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तूल, चार जिवंत आणि चार रिकामी काडतूसंही हस्तगत केली आहेत.

Mayur Ratnaparkhe

Fifth Accused Injured in Encounter and Arrested in Disha Patani house firing Case : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता पाचव्या आरोपीला बरेली पोलिसांनी एन्काउंटर करून अटक केली आहे.

बिहारीपूर नदीच्या पुलाजवळ चकमक झाली होती. ज्यामध्ये १९ वर्षीय रामनिवास उर्फ दीपू हा जखमी झाला होता, यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. हा आरोपी मूळचा राजस्थानमधील बेडकला येथील रहिवासी आहे. त्याच्या उजव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झालेला आहे.

दरम्यान चकमकीनंतर जखमी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय आरोपीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये तो पोलिसांना विनवनी करत होता आणि म्हणत होता की, आता परत कधीही उत्तर प्रदेशात परत येणार नाही, बाबाजींच्या पोलिसांसमोर कधीही येणार नाही.

पोलिसांनी या आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तूल, चार जिवंत आणि चार रिकामी काडतूसंही हस्तगत केली आहेत. याशिवाय त्याचाच अनिल नावाचा साथीदारही पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.  हा सोनीपत जिल्ह्यातील राजपूर येथील आहे. त्याचाकडूनही एक पिस्तूल दोन जिवंत आणि चार रिकामी काडतूसं जप्त करण्यात आली आहेत. हे दोघेही जण नंबरप्लेट नसलेली दुचाकी घेऊन पळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला; दोन जवान हुतात्मा, छायाचित्रे व्हायरल

Pune Road Potholes : पुणेकरांची खड्ड्यातून मुक्ती नाहीच! सीसीटीव्हीसाठी ५५० किलोमीटरची रस्ते खोदाई होणार

Barshi Crime : बार्शीच्या रेणूका कला केंद्रातील व्यवस्थापकाचे अपहरण; २० लाखांची मागितली खंडणी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री समिती व शिखर समितीची स्थापना; नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

IND vs OMN Live: स्वप्न पाहिलेलं २००चं, पण...! Sanju Samson उभा राहिला; अभिषेक, तिलक, अक्षर यांचे योगदान; सूर्या आलाच नाही

SCROLL FOR NEXT