Sanju Samson
esakal
India vs Oman Marathi Live Update Cricket : ओमानविरुद्ध प्रथम फलंदाजी करून २०० - २५० हून अधिक धावांचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाला मोजक्याच धावा करता आल्या. अभिषेक शर्मा व संजू सॅमसन सोडल्यास भारताचे अनेक फलंदाज घाई करत माघारी परतले. संजू सॅमसनने ( Sanju Samson) संयमी खेळ करताना अर्धशतकी खेळ केला आणि खऱ्या अर्थाने भारतीय संघाचा डाव सावरला. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा व अक्षर पटेल यांनी आक्रमक फटकेबाजी करून संजूला चांगली साथ दिली. ८ विकेट पडूनही सूर्यकुमार यादव फलंदाजीला न आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.