ncb mumbai sakal
देश

NCB : एनसीबीचे उच्चपदस्थ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांची मुख्य दक्षता अधिकारी पदावरून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांना शुक्रवारी गृह मंत्रालयाच्या आदेशाने मुख्य दक्षता अधिकारी पदावरून हटवण्यात आले. गेल्या ऑक्टोबर 2023 मध्ये, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि माजी एनसीबीझोनल डायरेक्टर समीर वानखडे यांच्या विरोधात दाखल याचिका फेटाळली होती. समीर वानखेडेंविरुद्ध सुरू असलेल्या चौकशी पथकाचे ज्ञानेश्वर सिंह नेतृत्व करत होते . न्यायालयीन प्राधिकरणाने सीबीआयने वानखेडे विरुद्ध दाखल गुन्हा बेकायदेशीर घोषित करण्यात आला होता. सोबतच ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात प्रतिकूल टिप्पणी केली.

प्राधिकरणाकडून टीका

एनसीबी मुंबईचे माजी जोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT )दिलासा दिला. समोर वानखेडे प्रकरणासंदर्भात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर एनसीबीचा पुनरावलोकन अर्ज न्यायाधिकरणाने फेटाळला होता.केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने समीर वानखेडे यांना दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र त्यानंतर एनसीबीने पुनरावलोकन अर्ज केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे सादर केला होता. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या कथित प्रक्रियात्मक त्रुटींच्या चौकशीसाठी एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह हे चौकशी पथकाचा भाग असू शकत नाहीत असे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले होते.

उच्च न्यायालयाचे खडे बोल

या सोबतच दिल्ली उच्च न्यायालयात दाखल आणखी एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी एनसीबीचे उपमहासंचालक (डीडीजी) ज्ञानेश्वर सिंग यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला. वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

घटनाक्रम

मुंबईत कॉर्डेलिया क्रुज शिपवर सुरु असलेल्या रेव पार्टी अमली पदार्थ असल्याची माहिती समीर वानखेडे यांना मिळाली. यावरून समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांसह या शिपवर धाड टाकली. धाड टाकल्यानंतर अनेकजण अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळले. ज्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील होता. ज्यामुळे त्याला काही दिवस तरुंगातही राहावे लागले होते. दरम्यान, याप्रकरणी आर्यन खानला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरूख खानकडून 25 कोटींची लाच मागितली होती, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यानंतर वानखेडे यांची चौकशी देखील करण्यात आली होती. या विरोधात वानखेडे यांनी केंद्रिय प्रशासकीय न्यायधिकरणाकडे दाद मागितली होती. याप्रकरणी कॅटने समीर वानखेडे यांच्या बाजूने निकाल दिला. समिर वानखेडे यांच्यावरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचे कॅटने म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा कोण? मध्यरात्री अचानक मोठे फेरबदल

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पीकविम्याचे २४०० कोटी; एप्रिलमध्ये सन्मान निधीचे प्रत्येकी ६००० रुपये मिळणार, वाचा...

बांधकाम कामगार नोंदणीत घोटाळा! ४ वर्षांत सोलापुरात वाढले सव्वालाख कामगार; एजंटांनी पैसे घेतले, ठरावीक ठेकेदारांनी दिली अनुभव प्रमाणपत्रे, वाचा...

ढिंग टांग : पुण्याची गणना कोण करी..? (एका भावी खासदाराची डायरी)

SCROLL FOR NEXT