देश

गुजरात काँग्रेसमध्ये जिग्नेश मेवाणीमुळे नाराजीनाट्य, दोन दिग्गजांनी सोडला 'हात'

अलीकडेच हार्दिक पटेल यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अलीकडेच हार्दिक पटेल यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सध्या देशातील राजकीय वातावरणात अनेक बदल दिसून येत आहेत. दरम्यान, आता गुजरातच्या काँग्रेसमधून दोन बड्या नेत्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही नेते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे माहिती समोर येत आहे. वरिष्ठ नेत्यांनी पक्ष सोडण्यामागे नेते जिग्नेश मेवाणी यांचे राजकीय क्षेत्रातील वाढते वजन मुख्य कारण मानले जात आहे. अलीकडेच हार्दिक पटेल यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार राजू परमार आणि माजी गृहमंत्री नरेश रावल यांनी काँग्रेस सोडली आहे. एका वृत्तानुसार, परमार यांनी दावा केला आहे की, मेवाणी यांनी आजपर्यंत पक्षासाठी काहीही केले नाही आणि असे असूनही त्यांना राजकारणात बढती मिळाली आहे. गुजरात काँग्रेसचे नवे नेते काँग्रेस हायकमांड आणि विशेषत: राहुल गांधींनी मेवाणींना दिलेल्या पसंतीबद्दल खदखदत आहेत.

राजधानी गांधीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना रावल म्हणाले, मी आणि राजू परमार यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 17 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. त्या दिवशी आमचे अनेक समर्थकही भाजपमध्ये प्रवेश करतील. परमार यांनीही येत्या दोन दिवसांत पक्ष सोडत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पक्षातील सहकाऱ्यांच्या फसवणुकीसह विविध कारणांमुळे आपण काँग्रेस सोडत असल्याचे रावल यांनी सांगितले. गेल्या 10 वर्षात मला पक्षात अनेक वाईट अनुभव आले आहेत. सध्या पक्षात टीमवर्कचा अभाव आहे. नेते कोणतीही अंतर्गत चर्चा न करता निर्णय घेतात आणि इतरांना लहान वाटतात. मलाही फसवणुकीचा अनुभव आला आहे. आपण भाजपकडे तिकीट मागितले नसल्याचेही रावल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT