dispute collegium Supreme Court government recommendations of 5 judges were approved by government 9 judge politics sakal
देश

Supreme Court : आणखी ९ न्यायमूर्तींच्या निवृत्तीचे वेध कॉलेजियम-सरकार वाद

९ न्यायाधीश ६५ वर्षांचे होतील त्यांची निवृत्ती होणार हे निश्चित

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात ५ नव्या न्यायमूतींचा शपथविधी झाला त्याच वेळी यंदाच्या वर्षी निवृत्त होणाऱया न्यायमूर्तींच्या जागांबाबतची चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम व सरकार यांच्यात वादंग झाल्यावर ५ न्यायमूर्तींच्या नावाच्या शिफारसी सरकारने मंजूर केल्या होत्या.

त्यामुळे नव्याने रिक्त होणाऱया न्यायमूर्तींच्या जागांवेळी पुन्हा तसेच चित्र निर्माण होणार का, अशी चर्चा सुरू आहे. न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे असते. यंदा सर्वोच्च न्यायालयाचे आणखी नऊ न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. आज पाच न्यायाधीशांचा शपथविधी झाला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या ३४ पैकी ३२ न्यायमूर्ती आता आसनाधीन होणार आहेत. रिक्त जागांचा प्रश्न तर्त तरी सुटला आहे.

आणखी दोन न्यायमूर्तींच्या नावाच्या शिफारशीलाही केंद्र सरकारकडून या आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या दोन नावांची शिफारसही सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अलीकडेच केली आहे. त्या नियुक्त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुन्हा पूर्ण क्षमतेने काम करेल.

त्याच वेळी या वर्षी एकूण ९ न्यायाधीश ६५ वर्षांचे होतील त्यांची निवृत्ती होणार हे निश्चित आहे. न्यायमूर्तींच्या नियुक्तीवेळी साऱया समाजघटकांचा विचार करावा असा सरकारचा आग्रह आहे. दरम्यान पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांचीन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम च्या शिफारशी मागे न्यायमूर्ती सय्यद अब्दुल नझीर यांच्या निवृत्तीचा दाखला दिला जातो.

न्यायमूर्ती नझीर यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अल्पसंख्याक समाजातील (मुस्लीम) न्यायाधीश नाहीत. न्यायमूर्ती पारडीवाला हेही अल्पसंख्यांक (पारशी) समाजाचे आहेत. न्यायमूर्ती नजीर या वर्षी ४ जानेवारी रोजी निवृत्त झाले, त्यानंतर न्या दिनेश माहेश्वरी १४ मे रोजी आणि न्या एम आर शाह त्यांच्या दुसऱ्याच दिवशी १५ मे रोजी निवृत्त होतील.

२०२३ मधील जून महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. न्या के एम जोसेफ १६ जूनला, न्या अजय रस्तोगी १७ जूनला आणि न्या व्ही रामसुब्रमण्यन त्यानंतर १२ दिवसांनी २९ जूनला निवृत्त होतील. न्या कृष्ण मुरारी ८ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर दोन महिने गेल्यावर न्या एस. रवींद्र भट्ट २० ऑक्टोबरला निवृत्त होतील. सध्या न्यायवृंदामधील ज्येष्ठतेतील दुसऱ्या क्रमांकाचे न्या संजय किशन कौल २५ डिसेंबरला म्हणजेच नाताळच्या दिवशी निवृत्त होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election: बंडखोरी टाळण्यासाठीचा डाव भाजपवरच कसा उलटला? पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं? ‘राष्ट्रवादीं’ची आघाडी यशस्वी?

माेठी बातमी! बॉम्बस्फोट प्रकरणातील बंटी जहागीरदारची हत्या; सात राउंड फायर, मित्र जखमी, आरोपी सीसीटीव्हीत कैद!

Plane Service : दिल्लीतील धुक्याचा विमानसेवेला फटका; पुण्याला येणारी तीन उड्डाणे रद्द; प्रवाशांची गैरसोय

8th Pay Commission : आठवा वेतन आजपासून लागू,सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या

सनी देओलच्या प्रेमात वेडी होती एका सुपरस्टारची सासू, दुसऱ्याशी लग्न केल पण, इकडे सनीसोबत गुपचूप प्रेमसंबंध चालूच!

SCROLL FOR NEXT