Arvind Kejriwal esakal
देश

दिल्लीत फटाक्यांशिवाय दिवाळी: AAP सरकारचा मोठा निर्णय

ऑनलाइन विक्री आणि वितरणावरही बंदी

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्वात प्रदुषित राज्य दिल्ली आहे. यामुळे आप सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, यावेळी दिल्लीत दिवाळी फटाकेमुक्त होणार आहे. दिल्ली सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घातली आहे. ही बंदी 1 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यावेळी ऑनलाइन विक्री आणि वितरणावरही बंदी घालण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे, त्यानी हा निर्णय वाढत्या प्रदूशनाला रोखण्यासाठी घेतला आणि लोकांच्या आरोग्यासाठी घेतल्याचे सांगितले. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी दिल्ली पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे गोपाल राय यांनी सांगितले. यावर्षी ऑफलाइन आणि ऑनलाइन फटाक्यांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.

गोपाल राय यांनी ट्विट केले की, दिल्लीतील जनतेला प्रदूषणाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच याही वेळी फटाक्यांच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या वापरावर पूर्ण पणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलिस, डीपीसीसी आणि महसूल विभागासोबत चर्चा करून आराखडा तयार केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! इराणवर हल्ला थांबवून २ आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू

Parbhani News: खासगी भूमापक सोडविणार जमिनीचा गुंता!; तीस दिवसांत मोजणी करण्याचे आदेश, पण तातडीने अंमलबजावणी होणार का?

Manipur Violence: मणिपूरमध्ये बाँबहल्ल्यात दोन भावंडांचा मृत्यू; गोळीबारात दोन आंदोलकांचाही मृत्यू, पाच जिल्ह्यांत ‘इंटरनेट’ बंद!

मतदार मॅपिंगसाठी ‘बीएलओं’नी नेमल्या खासगी व्यक्ती? मतदारांचे मॅपिंग सुरु, मतदार पत्त्यावर नसल्यास कमी होणार नाव; ‘या’ मतदारांची होणार सुनावणी

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांवरील शिक्षकांचे १०० टक्के अनुदानित शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांच्या जागेवर होणार समायोजन; आदेश नेमके काय? वाचा...

SCROLL FOR NEXT