DMK MP A Raja Video eSakal
देश

A Raja Video : 'हिंदू धर्म जगासाठी धोका'; DMK खासदार ए. राजा यांचं वक्तव्य! व्हिडिओ होतोय व्हायरल

DMK MP A Raja : यापूर्वी उदयानिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म हा मलेरिया आणि डेंग्यू असल्याचं म्हटलं होतं.

Sudesh

A Raja on Hinduism : गेल्या काही दिवसांपासून देशात सनातन आणि हिंदू धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. आता द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या एका व्हिडिओने या आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केलं आहे. या व्हिडिओमध्ये ए. राजा हे हिंदू धर्म जगासाठी धोका असल्याचं म्हणत आहेत.

तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अन्नामलाई यांच्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत द्रमुक हे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात जातियवाद पसरवत असल्याचा आरोप केला. तसंच, स्वतःच अशा गोष्टी पसरवून, द्रमुक खासदार सनातन धर्माला दोष देत असल्याचंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले ए. राजा?

अन्नामलाई यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ए. राजा एका ऑनलाईन चर्चासत्रात दिसत आहेत. ते म्हणतात, की जात आणि धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याच्या जागतिक रोगाचं कारण भारत आहे. जगातील इतर ठिकाणी राहत असलेले भारतीय नागरिक देखील हिंदू धर्माच्या नावाने जातियवादाचा प्रचार-प्रसार करत आहेत. त्यामुळे हिंदू धर्म हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक मोठा धोका आहे.

द्रमुककडून वादग्रस्त वक्तव्ये

यापूर्वी तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयानिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म हा मलेरिया आणि डेंग्यू असल्याचं म्हटलं होतं. तर, द्रमुकचे ए. राजा यांनी स्टॅलिन यांनी अगदीच नरम तुलना केल्याचं म्हणत, सनातनची तुलना एचआयव्ही रोगाशी करायला हवी, असं वक्तव्य केलं होतं.

यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपकडून या मुद्द्यावरुन द्रमुकवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यातच आता भाजप नेत्याने ए. राजा यांचा व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे हा वाद पुन्हा नव्याने सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT