DMK MP SR Parthiban 
देश

DMK MP SR Parthiban: सभागृहात खासदार हजर नव्हते तरी केलं निलंबन; लोकसभा सचिवालयाला उपरती

सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल गुरुवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी काही खासदारांचे लोकसभेतून निलंबित करण्यात आले

Sandip Kapde

DMK MP SR Parthiban: आज 15 खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. यामध्ये 1 राज्यसभेचा तर 14 खासदार लोकसभेचे होते. दरम्यान यापैकी एका खासदाराचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. यापैकी एक खासदार उपस्थित नव्हते तरी देखील त्यांचे निलंबन करण्यात आले होते. दरम्यान डीएमके खासदार एसआर पार्थिबन यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल गुरुवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या 14 विरोधी खासदारांमध्ये DMK नेते एसआर पार्थिबन यांचे नाव होते.

सरकारने नंतर स्पष्ट केले की पार्थिबन यांचा समावेश चुकून करण्यात आला होता. एकूण 13 विरोधी खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

DMK खासदारांनी यापूर्वी तक्रार केली होती की निलंबित खासदारांमध्ये नाव असलेले एसआर पार्थिबन हे सभागृहातही नव्हते ते चेन्नईत आहेत. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, "लोकसभेतून एकूण 13 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. वेलमध्ये उपस्थित नसलेल्या एका खासदारालाही निलंबित करण्यात आले होते. आम्ही लोकसभेच्या अध्यक्षांना ते नाव काढून टाकण्याची विनंती केली होती त्यांनी ती स्वीकारली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT