notes 
देश

गोमन्तकीय मुलींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नकोय का?

तेजश्री कुंभार

पणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते. आतापर्यंत या योजनेच्या एकोणसाठ हजार सातशे मुली लाभार्थी असून गेल्या सहा वर्षात एकाही गोमन्तकीय मुलीने व्यवसाय उभा करण्यासाठी सरकारकडून ही मदत घेतलेली नाही. महिला आणि बालकल्याण संचालनालयाच्या या योजनेचा प्रचार अत्यंत चांगला केला जात असतानाही योजनेचा लाभ केवळ लग्न आणि शिक्षणासाठीच घेतला जात असल्याचे समोर आले आहे. 

मुलींना सबल आणि सशक्‍त करण्यासाठी गोवा सरकारने जुलै 2012 साली लाडली लक्ष्मी नावाची योजना तयार केली. मुलींची लग्ने त्यांच्या आईवडिलांना ओझे वाटू नयेत तसेच त्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी या अनुषंगाने ही आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येते. व्यवसायासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रात मुलींनी आपले पाय रोवावेत आणि स्वताचे अस्तित्व निर्माण करावे म्हणून ही मदत व्यवसायासाठीही देण्यात येऊ लागली पण अद्यापही व्यवसायासाठी एकाही गोमन्तकीय मुलीने या योजनेचा लाभ घेतलेला नाही ही बाब निराशाजनक आहे. 

18 ते 40 वयोगटातील मुलींना देण्यात येणारी ही मदत बऱ्याचवेळी केवळ लग्नासासाठी आणि इच्छा असेल तर शिक्षणासाठी घेतली जाते. आतापर्यंत या योजनेसाठी राज्यभरातून पंच्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न मुलींनी अर्ज केला होता त्यातील दोन हजार सहाशे अकरा मुलींचे अर्ज विविध कारणास्तव रद्‌द करण्यात आले. सध्या बारा हजार चारशे बावन्न मुलींचे अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती मिळाली. 

मुलींना आहे योजनेची माहिती... 
लाडली लक्ष्मी या योजनेबाबतची माहिती मुलींना आहे का...हे पडताळण्यासाठी दै. गोमन्तकने पणजीतील फार्मसी महाविद्यालय उभा असणाऱ्या काही मुलींशी संपर्क साधला असता या योजनेची सर्व माहिती मुलींना असल्याची माहिती मिळाली. आम्ही हे पैसे लग्नासाठी वापरणार असून लग्न करतानाच ही मदत घेणार असल्याचे उत्तरही काही मुलींनी दिले. महिलांची जडणघडण झपाट्याने होत असताना आणि आर्थिक सुविधा उपलब्ध असतानाही मुलींनी अशा योजनांचा लाभ कमी प्रमाणात घेणे ही बाब निराशाजनक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

हल्लेखोर को-पायलटचं नाव समोर, ओमानमध्ये घातलेली बंदी; कट्टरपंथी विचारसरणीचा असल्याचंही उघड

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Gold Silver Prices : पितृपक्षामुळे सोने-चांदीची 'झळाळी' पडली फिकी; ग्राहकांची खरेदीकडे पाठ, आता विजयादशमीची आशा, जाणून घ्या दर

SCROLL FOR NEXT