Narendra Modi 
देश

मी काय करतो ठावूक आहे का? चिमुरडीने उत्तर देताच मोदीही खळखळून हसले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी भाजपचे अनेक खासदार सहकुटुंब भेटण्यासाठी जातात. आज भाजपचे खासदार अनिल फिरोजिया यांनी मोदींची आपल्या कुटुंबासह भेट घेतली. यावेळी त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीने मोदींना खळखळून हसवलं. (Narendra Modi News in Marathi)

मध्य प्रदेशातील भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी आपल्या कुटुंबाला संसदेत पंतप्रधानांना भेटण्यासाठी आणले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींना त्यांची मुलगी अहाना फिरोजिया हिला पाहून आनंद झाला. त्यानंतर मोदींनी मी कोण असा प्रश्न अहानाला केला. त्यावर अहाना म्हणाली, तुम्ही मोदीजी आहात आणि रोज टीव्हीवर येता.

त्यानंतर मोदींनी अहानाला विचारलं मी काय करतो ठावूक आहे का, त्यावर अहाना म्हणाली की, तुम्ही लोकसभेत असता. त्यावर एकच हशा पिकला. यावेळी पंतप्रधान मोदी देखील खळखळून हसले. त्यानंतर मोदीजींनी अहानाला चॉकलेट भेट दिले.

अनिल फिरोझिया सर्वांना ठावूक आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वजन कमी करण्याचं आव्हान दिलं होतं. तसेच एक किलो वजन कमी केल्यास मतदार संघासाठी 1 हजार कोटी निधी देईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर ते चर्चेत आले होते. पंतप्रधान मोदींनीही देखील त्यांच्या वजन कमी करण्यावर भाष्य केले होते.

यावेळी मोदींनी फिरोझिया यांना मोदींनी पूर्णपणे तंदरुस्त राहण्यासाठी आणखी वजन कमी करण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT