up crime 
देश

Crime News: डॉक्टर पतीने पत्नीला दोन प्रियकरासोबत हॉटेल रुममध्ये पकडलं; धक्कादायक व्हिडिओ समोर

Doctor Catches Wife With 2 lovers: एका धक्कादायक घटनेमध्ये डॉक्टर पतीने आपल्या पत्नीला दोन प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- एका धक्कादायक घटनेमध्ये डॉक्टर पतीने आपल्या पत्नीला दोन प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर पतीने पत्नी आणि दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली आहे. उत्तर प्रदेशातील कसगंजमधील ( UP Kasganj) हा प्रकार असून सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे महिला सरकारी डॉक्टर आहे. 'फ्री प्रेस जर्नल'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर पती-पत्नीमध्ये वाद होता. त्यामुळे पत्नी गेल्या एक वर्षांपासून पतीपासून वेगळं राहात होती. पतीने पत्नीचे बिंग फोडण्याचं ठरवलं होतं. पत्नी एका हॉटेलमध्ये असल्याची त्याला माहिती मिळाली होती. त्यानंतर तो हॉटेलमध्ये गेला अन् जबरदस्तीने हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश केला. ( Doctor Catches Wife With 2 lovers)

हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश केल्यानंतर पतीला धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. पत्नी दोन प्रियकरासोबत लैंगिक क्रीडेमध्ये गुंतलेली होती. एक व्यक्ती गाझीयाबाद तर दुसरा व्यक्ती बुलदंशहरचा होता. डॉक्टर पतीला पाहून पत्नी आणि दोन व्यक्तींनी हॉटेल रुमच्या टॉयलेटमध्ये आश्रय घेतला होता.

पती आपल्या काही नातेवाईकांसोबत तिथे आला होता. त्याने पत्नी आणि त्या दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. काहीवेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात पती आणि त्याचे दोन नातेवाईक, दोन प्रियकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकारात महिला डॉक्टरचा सहभाग असूनही पोलिसांनी तिला अटक केलेली नाही. पोलिसांनी सांगितलं की, याप्रकरणी पुढील तपास सुरु असून नेमका प्रकार समजून घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT