देश

Doctors Day: "डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध"

देशातील १३० कोटी जनतेच्यावतीनं डॉक्टरांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वैद्यकीय तज्ज्ञांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात देशातील डॉक्टर्स मंडळींनी जे अतुलनीय योगदान दिलं आहे, त्याबद्दल देशातील १३० कोटी जनतेच्यावतीनं कृतज्ञता व्यक्त केली. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही दिली.

मोदी म्हणाले, "कोरोना काळात देशातील डॉक्टरांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले. कित्येक डॉक्टरांनी उपचारांवेळी आपल्या प्राणांची आहुती दिली. कोरोना काळात ज्या प्रकारे आपल्या डॉक्टरांनी देशाची सेवा केली आहे. त्यामुळे ते स्वतःचं एक प्रेरणा ठरले आहेत. त्यामुळे देशातील १३० कोटी भारतीयांच्यावतीनं देशातील सर्व डॉक्टरांचे मी आभार मानतो."

सरकारने आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिलं

मोदी म्हणाले, "आमच्या सरकारनं आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. देश सध्या कोविडविरोधात मोठी लढाई लढत आहे. सरकारच्यावतीनं डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबाबत पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी आम्ही आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणेसाठी १५,००० कोटी रुपये दिले होते. या वर्षी आरोग्यसेवेसाठी दोन लाख कोटींहून अधिक बजेटची तरतूद करण्यात आली आहे."

मागील सरकारांवर साधला निशाणा

देशातील मागील सरकारांवर निशाना साधताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, "इतक्या दशकांमध्ये देशात ज्या प्रकारचं वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं होतं. त्याच्या मर्यादा या कोविडकाळात आपणं चांगल्याप्रकारे जाणल्या आहेत. आधीच्या काळात वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चरला कशाप्रकारे दुर्लक्ष करण्यात आलं होतं, ते ही आपण जाणता. पण आमच्या सरकारचा फोकस हा वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT