domestic airlines likely closed due to huge loss of half passenger 
देश

धक्कादायक ! देशांतर्गत विमान कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर?

वृत्तसंस्था

दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित केलेली आंतरदेशीय विमानसेवा केंद्र सरकारने पुन्हा सुरू केली असली, तरी अपेक्षित व्यवसाय होत नसल्याने कंपन्या हतबल झाल्या आहेत. प्रचंड तोटा होत राहिल्यास काही कंपन्या बंद पडू शकतात, असा इशारा या क्षेत्रातील सल्लागार कंपनी सीएपीएने दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या अनेक विमानांमध्ये निम्मेच प्रवासी असतात. प्रवासी संख्या वाढण्याची सध्या शक्यता नाही. यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांना तीन ते साडेतीन अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागेल. हा तोटा २.५ अब्ज डॉलरचा असेल, असा आधीचा अंदाज होता. विमान कंपन्यांना दुसऱ्या तिमाहीत हा मोठा तोटा सोसावा लागेल. त्यातून काही कंपन्या बंद पडण्याची शक्यता आहे.

दररोज सत्तर हजार जणांनी प्रवास करत असून देशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत विमानांची फक्त ५५ टक्के आसनांची तिकिटे विकली गेली. विमानात ३० टक्के प्रवासी असले, तरी उड्डाण करण्यास सरकारने परवानगी दिली असल्याने गेल्या महिन्यात दररोज सरासरी सत्तर हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमानांतून प्रवास केला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात आंतरदेशीय विमानांतून दररोज सरासरी ४ लाख लोक प्रवास करत होते.
-------------
धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक; स्वतःच केली फेसबुक पोस्ट
-------------
सावधान हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग !
------------

दरम्यान, देशांतर्गत सेवा देणाऱ्या कंपन्यांना आर्थिक डोलारा सावरण्यास मदत न मिळाल्यास फक्त दोन ते तीनच कंपन्या अस्तित्व टिकवून ठेवतील. केंद्राचा आंतरदेशीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय योग्य होता. पण तिकिटांचे दर बाजारपेठेतील घडामोडींनुसार निश्चित करण्यात आले पाहिजेत, असे काही देशांतर्गत विमान कंपन्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT