bjp leader anil vij
bjp leader anil vij 
देश

#Chowkidar ...तर तुमच्या नावाआधील #Pappu लिहाः भाजप मंत्री

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः आम्ही आमच्या नावाच्या आधी 'चौकीदार' लिहिले असून, तुम्हाला जर याचा त्रास होत असेल तर तुम्हीही आपल्या नावाआधी 'पप्पू' लिहा, असे हरयाणाचे कॅबिनेट मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते अनिल विज यांनी म्हटले आहे.

विज यांनी काँग्रेसवर ट्विटरवरून टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना 'चौकीदार चोर है'ची घोषणा देतात. त्यांच्या या घोषणेला उत्तरादाखल मोदींकडून 'मैं भी चौकीदार' ही घोषणा देण्यात येत आहे.

विज यांनी ट्विट करत काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, आम्ही आमच्या नावाआधी #Chowkidar लिहिले आणि याचा तुम्हाला त्रास होत आहे. तुम्हीही आपल्या नावाआधी #Pappu लिहा. आमचा याला काहीच आक्षेप नाही. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर आपल्या नावा आधी Chowkidar लिहिले आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेते आणि समर्थकही आपल्या नावाआधी चौकीदार लिहून मोदी यांच्या मोहिमेत सहभागी होत आहेत.

दरम्यान, विज हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राहुल गांधी यांना काही दिवसांपूर्वी 'निपा व्हायरस' म्हटले होते. या व्हायरसमुळे ते कोणत्याही पक्षात जातील तो पक्ष संपवून टाकतील, अशी टीका त्यांनी केली होती. यानंतर विज यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्याचबरोबर जे गोमांस खातात त्यांची हरयाणात गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT