DY Chandrachud 
देश

DY Chandrachud: कोर्टाला ‘तारीख पे तारीख’ बनवू नका; सरन्यायाधीश DY चंद्रचूड वकिलांवर का संतापले?

सकाळ वृत्तसेवा

DY Chandrachud:  वकिलांनी नवीन खटल्यांच्या सुनावणीच्या स्थगितीची मागणी करू नये, असे आवाहन करत सर्वोच्च न्यायालय ‘तारीख पे तारीख’ न्यायालय होऊ नये, अशी अपेक्षा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज व्यक्त केली.

काल (शुक्रवार) न्यायालयात सुनावणीच्या कामकाजाला सुरुवात होताच सरन्यायाधीशांनी वकिलांकडून नवीन खटल्यांच्या सुनावणीला स्थगिती मागितली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या दोन महिन्यांत वकिलांकडून ३,६८८ प्रकरणांच्या सुनावणीच्या स्थगितीची मागणी करण्यात आल्याची आकडेवारीही त्यांनी सादर केली.

सरन्यायाधीश यावेळी वकिलांना उद्देशून म्हणाले, की अतिशय आवश्यक असल्याखेरीज संबंधित प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्याची विनंती करू नका. हे ‘तारीख पे तारीख’ न्यायालय होऊ नये, अशी माझी इच्छा आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या मदतीमुळे सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केल्यावर त्यांच्या सुनावणीसाठी लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी झाला आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.  मात्र, सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी होत असताना संबंधित वकील स्थगितीची मागणी करतात. त्यातून बाहेरच्या जगात अतिशय वाईट संदेश जातो. (Latest Marathi News)

आज प्रकरणांच्या स्थगितीच्या १७८ स्लीप दाखल करण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यापासूनच्या प्रत्येक दिवशी अशा १५० स्लीप दाखल होत आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांतील स्थगितीची मागणी करणाऱ्या स्लिपची संख्या ३,६८८ वर गेली आहे.  

-धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT