Doordarshan 
देश

स्वातंत्र्याच्या ‘अमृतकाळा‘त दूरदर्शन करणार राष्ट्रवादाचा जागर !

देशभक्तीपर धारावाहिकांचे लॉंचिंग

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - देशाच्या ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत निशुल्क पोचणारी एकमेव वाहिनी असलेल्या दूरदर्शन या सरकारी प्रसारण संस्थेने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रभक्ती व राष्ट्रवादाचा जागर करण्यासाठी अनेक कार्यक्रम प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य चळवळीतील ज्ञात-अज्ञात घटना यानिमित्ताने जगासमोर आणणारी ‘स्वराज - भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ हे ७५ भागांचे हिंदी धारावाहिक उद्यापासून (ता. १४) दर रविवारी रात्री ९ वाजता डीडी नॅशनल वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.

दूरदर्शन हे खासगी वाहिन्यांच्या टीआरपी शर्यतीत न पळणारे माध्यम आहे. आकाशवाणीप्रमाणेच बातम्यांची तटस्थता कठोरपणे पाळणारे प्रसारमाध्यम म्हणूनही त्याचा लौकिक होता. केंद्र सरकारने संसदेत याच महिन्यात दिलेल्या माहिनीनुसार दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांची एकत्रित प्रेक्षक संख्या २०१९ मध्ये ७६०.४ दशलक्ष होती. २०२० मध्ये ती ७४७ दशलक्षांवर तर मागील वर्षी (२०२१)त्यापेक्षा कमी म्हणजे ६८४.९ दशलक्षांपर्यंत आली.

गसरत्या प्रेक्षकसंख्येला सावरण्यासाठी दूरदर्शनने आता देशभक्तीच्या माहिलांचा बूस्टरडोस देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आगामी काळात राष्ट्रभक्तीवर आधारित मनोरंजनात्मक कार्यक्रमांची सर्व भारतीय भाषांतील दूरदर्शन केंद्रांवरून रेलचेल पहायला मिळणार आहे. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मयंक अग्रवाल यांनी सांगितले क भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात घटना-कथा यांच्यावर आधारित ‘आजादी...‘ ही धारावाहिक मालिका रविवारपासून डीडी नॅशनल वाहिनीवरून दर रविवारी देशभरात प्रसारित केली जाईल. कॉन्टिलो पिक्चर्स’ ची निर्मिती असलेल्या या धारावाहिक मालिकेचे प्रसारण दर रविवारी रात्री ९ ते १० या काळात करण्यात येईल. मंगळवार, गुरूवार व शनिवारी तिचे पुनःप्रसारण केले जाईल.

आगामी काळात देशभक्ती, महिला सशक्तीकरण, मनोरंजन, साहित्य-संगीत-कला आदी विषयांवरील नवनवीन कार्यक्रम प्रसारित करण्याचीही योजना दूरदर्शनने आखली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. त्यादृष्टीने ‘जय भारती’, ‘कॉर्पोरेट सरपंच’, ‘ये दिल मांगे मोर’ यासारख्या मालिका प्रसारित करण्यात येमार आहेत. सुगम संगीतक्षेत्रात नवनवीन आवाजांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘सुरो के एकलव्य' हा रिॲलिटी कार्यक्रमही सादर करण्यात येईल. यात बॉलीवूड संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकाल परीक्षक म्हणून उपस्थित राहतील. भारतरत्न लता मंगेशकर, पद्मविभूषण आशा भोसले, उषा मंगेशकर, महंमद रफी, किशोरकुमार आदी दिग्गजांनी दाखविलेल्या वाटेवरून गायनाच्या क्षेत्रात यशाच्या शिखराकडे वाटचाल करू इच्छिणाऱया युवकांसाठी हा कार्यक्रम असेल. स्टार्टअप-चॅम्पियन कार्यक्रमाच्या दुसऱया पर्वाचे प्रसारण लवकरच सुरू होईल. यात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणकी ४६ स्टार्टअपची विजयगाथा युवकांना पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT