double penalty if they are from AAP: Arvind Kejriwal on Delhi violence 
देश

आम आदमी पक्षाच्या नेत्यांना डबल शिक्षा द्या : केजरीवाल

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सीएए विरोधात दिल्लीत आंदोलनाचा भडका उडाला असून ही आग भडकवण्यामागे दिल्लीतील काही स्थानिक राजकीय नेत्यांचाही हात असल्याचे समोर आले आहे. हिंसाचारात सामील असलेले लोक आम आदमी पक्षाचे असल्याचे असतील, तर त्यांना दुप्पट शिक्षा द्या, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

कुठल्याही पक्षाचा नेता असूद्या, दोषी आढळल्यास त्याला कडक शिक्षा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. परंतु, जर तो नेता आपचा असेल तर त्याला डबल शिक्षा द्या असेही केजरीवाल यांनी यावेळी म्हटले. आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांचा दंगलींमध्ये सहभाग असल्याबाबत विचारणा केली असता; दंगल करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो, तिची गय केली जायला नको, असे ते म्हणाले.

जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकार १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देईल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. गंभीर जखमींना २ लाख रुपये देण्यात येतील. या हिंसाचारात जखमी झालेल्या आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार सोसेल. जाळपोळीत ज्यांनी महत्त्वाची कागदपत्रे गमावली, त्यांना ती परत मिळण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील अशीही माहिती केजरीवाल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : सदोष मतदार याद्यांवर निवडणूक घेणं ही आयोगाची करप्ट प्रॅक्टीस - उद्धव ठाकरे

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT