Dr babasaheb Ambedkar 70 feet statue at Latur Statue of Knowledge
Dr babasaheb Ambedkar 70 feet statue at Latur Statue of Knowledge sakal
देश

डॉ. आंबेडकर यांचा लातूर येथे ७० फुटी पुतळा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लातूरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० फूट उंचीचा ‘स्‍टॅच्‍यू ऑफ नॉलेज’ पुतळा उभारण्यात आला आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आदींच्या मुख्य उपस्थितीत येत्या १३ एप्रिलला या पुतळ्याचे अनावरण होईल, असे खासदार सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांनी सांगितले. हा पुतळा मोदी सरकारच्या सामाजिक सद्भावाच्या धोरणाचे आणखी एक प्रतीक व प्रेरणास्थान बनेल, असेही ते म्हणाले.

लातूरमध्ये येत्या १३ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आंबेडकर उद्यानात विशेष कार्यक्रम होणार आहे. त्यात या पुतळ्याचे अनावरण तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : व्यक्तित्व, वक्तृत्व तथा कृतित्व’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल, असे सांगून खासदार श्रृंगारे म्हणाले, की या भव्य पुतळ्याची निर्मिती स्टीलच्या पायावर फायबरचा वापर करून केली आहे. गेले अनेक महिने या पुतळ्याचे काम सुरू होते.

डॉ. आंबेडकरांचा हा राज्यातील सर्वांत उंच पुतळा आहे, असे सांगून श्रृंगारे म्हणाले की डॉ. आंबेडकरांवरील पुस्तकात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींचे विचार व भाषणे असणार आहेत. सद्यःस्थितीत डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रासंगिकता आणखी वाढली असल्याने नव्या पिढीसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल. मोदी सरकारने डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडितलंडन व नागपूरसह पाच स्थळांचा (पंचतीर्थ) वेगाने विकास केला. त्या प्रेरणेतूनच लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा उभारण्याची कल्पना आपण प्रत्यक्षात आणली असेही श्रृंगारे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT