Narendra Modi sakal
देश

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वंचित घटकांना कधीच आरक्षण दिले नसते.

पीटीआय

महाराजगंज- मोतिहारी - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वंचित घटकांना कधीच आरक्षण दिले नसते. पंडित नेहरू यांनी वंचितांच्या आरक्षणाला विरोध केला होता,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील महाराजगंज येथील सभेत बोलताना केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आरक्षणाबाबत नेहरूंनी राज्यांच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते त्यातून ही बाब स्पष्टपणे दिसून येते, राजीव गांधी असो की इंदिरा गांधी त्यांनी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास घटकांच्या आरक्षणाला विरोधच केला होता. या घटकांना काँग्रेसकडून कधीच सन्मान मिळू शकत नाही.’

‘इंडिया’ आघाडी धार्मिक, जातीयवादी आणि घराणेशाहीच्या मानसिकतेची आहे. भ्रष्टाचार, लांगुलचालनाचे राजकारण व सनातन धर्मविरोधी मानसिकता याचा या आघाडीला फटका बसेल,’ असे त्यांनी नमूद केले. गांधी आणि नेहरू कुटुंबीयांवरही पंतप्रधान मोदींनी टीका केली. ‘‘काँग्रेसच्या नेत्यांनी पंजाब, तेलंगण व तमिळनाडूतील लोकांवर टीका केली होती पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

त्यामुळे ते काही स्थानिक खासदार निवडण्यासाठी नाही तर पंतप्रधानांची निवड करण्यासाठी मतदान करत आहेत हे लोकांनी लक्षात घ्यावे,’ असे त्यांनी सांगितले. ‘‘अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण काढून घेण्यासाठी काँग्रेसला देशाच्या राज्यघटनेत बदल करायचा आहे. राज्यघटना तयार करताना डॉ. आंबेडकर नसते तर नेहरूंनी एससी आणि एसटी या घटकांना कधीच आरक्षण मिळू दिले नसते,’ असा आरोप त्यांनी केला.

राहुल, अखिलेश लक्ष्य

राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर टीका करताना मोदींनी ही नेते मंडळी चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली असल्याचा टोला लगावला. तेजस्वी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘जंगलाराजचे वारसदार मला हरविण्याची भाषा बोलत आहेत. काँग्रेसच्या शहजाद्यांना मला रडताना पाहायचे आहे. त्यांच्या पक्षाने उघडपणे ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ अशी घोषणा दिली आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT