Mucormycosis Esakal
देश

Mucormycosis: डॉ. लहानेंचा दावा टॉप व्हायरॉलॉजिस्टनं काढला खोडून!

मेडिकल ऑक्सिजन नियोजनाच्या समितीवर SCकडून डॉ. कांग यांची नियुक्ती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : महाराष्ट्रातचं नव्हे तर देशभरात थैमान घातलेल्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराबाबत राज्यातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांनी नुकताच एका दावा केला होता. त्यांचा हा दावा देशातील टॉपच्या व्हायरॉलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग (Dr. Gagandip Kang) यांनी खोडून काढला आहे. मेडिकल ऑक्सिजन नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवर सुप्रीम कोर्टाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये डॉ. कांग यांचा समावेश आहे. (Dr Lahane claim about mucormycosis was refuted by top virologist Dr Gagandip Kang)

दुर्मिळ असलेल्या काळी बुरशी अर्थात म्युकरमायकोसिस या आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्यामागे कोरोना विषाणूचं म्युटेशन कारणीभूत असल्याचा दावा नुकताच डॉ. तात्याराव लहाने यांनी केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, "कोरोनावरील उपचारांमुळे म्युकरमायकोसिस वाढत नाहीए तर कोरोनाच्या विषाणूचं म्युटेशन होत असल्यानं तसेच भारतात आढळलेल्या नव्या व्हेरियंटमुळं हा आजार अनेकांमध्ये बळावला आहे."

कोरोनाच्या नवा व्हेरियंट स्वादुपिंडातील बीटासेलवर परिणाम करत आहे. त्यामुळे व्यक्तीच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तींमध्ये प्रामुख्याने म्युकरमायकोसिस आजार झाल्याचं आढळून येत आहे. म्हणजेच कोरोनावरील उपचारांमुळे नव्हे तर कोरोनाच्या नव्या विषाणूमुळेच हा आजार बळावत आहे. त्यासाठी अधिकाधिक स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा, असंही डॉ. लहाने यांनी म्हटलं होतं.

मात्र, आता डॉ. गगनदीप कांग यांनी डॉ. लहाने यांचा हा दावा खोडून काढला आहे. डॉ. कांग यांनी म्हटलं की, काळ्या बुरशीचा आजार म्हणजेच म्युकरमायकोसिस हा कोरोनाच्या व्हेरियंटमुळे होतोय असं मला वाटत नाही. या आजारांचे जे रुग्ण आढळून आले आहेत त्यांतील काही तथ्यांवर आधारीत मी हे सांगते आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये उपचार करताना मुक्तपणे स्टेरॉईडचा वापर झालेल्या रुग्णांमध्ये पुढे हा आजार आढळून आला आहे. तसेच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनाही या आजाराचा मोठा धोका असल्याचं दिसून आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT