देश

DRDO च्या 2DG औषधाचं कमर्शियल लाँचिंग; जाणून घ्या काय आहे किंमत

विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोना महासाथीविरोधात भारत सध्या लढा देत आहे. सध्या लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणावर सुरु असून परिस्थिती मात्र संपूर्णत: पूर्ववत झालेली नाहीये. कोरोना विरोधातील या लढ्यामध्ये निर्णायक भुमिका निभावणाऱ्या डीआरडीओने विकसित केलेल्या औषधाकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 2-डीजी असं या औषधाचं नाव आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने म्हटलंय की, कोरोनाचं हे स्वदेशी औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.

डीआरडीओने एक जून रोजी म्हटलं होतं की, कोरोना संक्रमित असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली गेली आहे. त्यानंतर या औषधाचा वापर काही मोजक्या हॉस्पिटल्समध्ये केला जात होता. मात्र आता हे औषध सरकारी हॉस्पिटल्ससोबतच खासगी हॉस्पिट्लसना देखील विकण्यात येणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने म्हटलंय की, त्यांना या गोष्टीचा आनंद आहे की, कंपनी लवकरच भारतभरातील प्रमुख सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्सना या औषधाचा सप्लाय करणार आहे.

काय आहे किंमत?

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सांगण्यानुसार, या औषधाच्या एका पाऊचची किंमत 990 रुपये ठरवण्यात आली आहे. हा सब्सिडीसोबत सरकारी संस्थाना दिला जाणारा दर आहे.

2डीजी औषधाची निर्मिती इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन अँड अलाईड सायन्सेस द्वारा विकसित केलं गेलं होतं. क्लिनिकल ट्रायल्समध्ये हे सिद्ध झालंय की, 2-DG हे औषध जे रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत तसेच जे रुग्ण सिलिंडरमधील ऑक्सिजन अवलंबून आहेत त्यांना हे औषध घेतल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी होऊ शकते. ज्या रुग्णांना 2 DG हे औषध दिलं जातंय त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येण्याचं प्रमाणंही जास्त आहे. त्यामुळे या औषधाकडून लोकांच्या मोठ्या आशा आहेत.

DG-2 हे औषध DRDO नं विकसित केलं असून ते कोरोनावर प्रभावी असल्यानं त्याला कोरोनाच्या रुग्णांवर वापरासाठी नुकतीच परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी हे औषध आता बाजारातही आलं आहे. पण DRDO नं खास करुन कोरोनासाठी विकसित केलेलं हे औषध नाही, यापूर्वी हे औषध कर्करोगाच्या आजारावरही वापरण्यात आलं आहे, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी याआधी ही माहिती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT