देश

व्ही अनंत नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : डॉ. व्ही अनंत नागेश्वरन (Dr. V Anantha Nageswaran) यांची नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही दिवस अगोदर हे पाऊल उचलण्यात आले आहे. डॉ. नागेश्वरन यांनी भारत आणि सिंगापूरमधील अनेक बिझनेस स्कूल आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये अध्यपन केले आहे. तसेच त्यांनी शिक्षक, सल्लागार आणि लेखक म्हणूनही काम केले आहे. (Dr. V Anantha Nageswaran Appointed As Chief Economic Advisor For Union Finance Ministry)

नागेश्वरन IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आणि Krea विद्यापीठातील अर्थशास्त्राचे विशिष्ट व्हिजिटिंग प्रोफेसर होते. 2019 ते 2021 पर्यंत भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ते अर्धवेळ सदस्यही राहिले आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका आणि मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली आहे.

केव्ही सुब्रमण्यम यांचा डिसेंबर 2021 मध्ये कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. तेव्हापासून या पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे भारताची आर्थिक स्थितीवर काहीसा परिणाम झाला आहे, याशिवाय भारतासमोर बेरोजगारी ही देखील मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत डॉ. नागेश्वरन यांची मुख्य अर्थिक सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT