Rachakonda Police esakal
देश

ISI च्या महिला हँडलरसोबत माहिती शेअर केल्याप्रकरणी DRDL च्या कर्मचाऱ्याला अटक

सकाळ डिजिटल टीम

ज्या महिलेसोबत माहिती लीक केलीय, ती पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ची महिला हँडलर असल्याचा संशय आहे.

हैदराबाद : संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळामधील (Defence Research & Development Laboratory, DRDL) अभियंता आयएसआय ऑपरेटिव्ह असल्याचा संशय असलेल्या एका महिलेनं त्याला लग्नाचं आमिष दाखवून भारताच्या क्षेपणास्त्र विकास, तेलंगणातील संवेदनशील माहिती लीक करण्यास भाग पाडलंय, असा पोलिसांनी (Rachakonda Police) दावा केलाय. मल्लिकार्जुन रेड्डी (वय 29) या आरोपीला अटक करण्यात आलीय. नताशा रावच्या नावाखाली भारतीय असल्याचा मुखवटा मिरवणाऱ्या पाकिस्तानी गुप्तहेराशी (ISI) त्याचे संबंध उघड झाल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, एलबी नगर झोनच्या विशेष कार्य पथकानं बालापूर पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत आरसीआय कॉम्प्लेक्समध्ये कार्यरत असलेल्या मल्लिकार्जुन रेड्डीला (Mallikarjuna Reddy) अटक केलीय. DRDL-RCI कॉम्प्लेक्सशी संबंधित गोपनीय माहिती सोशल मीडियाद्वारे एका महिलेसोबत शेअर केल्याचा त्याच्यावर संशय आहे. ज्या महिलेसोबत माहिती लीक केलीय, ती पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ची महिला हँडलर असल्याचा संशय आहे.

मल्लिकार्जुननं बीटेक आणि एमबीए केलं असून डीआरडीएल सोबतच्या कामाबाबतची माहिती त्यानं फेसबुक अकाउंटवरुन शेअर केली होती. नताशा राव असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेनं त्याच्याशी संपर्क साधला आणि यूके डिफेन्स जर्नलचा (UK defence journal) कर्मचारी म्हणून स्वत:ची ओळख करून देणार्‍या एका संशयित आरोपीला तिनं आपल्या जाळ्यात अडकवलं. पोलिसांना याबाबतचा संशय आल्यानं त्याला अटक करण्यात आलीय.

सिमरन चोप्रा आणि ओमिशा अदी यांच्यासह इतर नावांनी ओळखल्या जाणार्‍या नताशा रावच्या नंतरच्या संभाषणादरम्यान, मल्लिकार्जुन रेड्डीनं गोपनीय माहिती सामायिक केली आणि त्यांच्या बँक खात्याचे तपशील देखील शेअर केले. पोलिसांनी रेड्डीविरुद्ध अधिकृत गुप्तता कायदा-1923 च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, एक सिमकार्ड आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT