crime crime
देश

रोहिणी कोर्टात DRDO च्या शास्त्रज्ञानं केला स्फोट, वकिलाला ठार करण्याचा होता प्लॅन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रोहिणी न्यायालयात ९ डिसेंबरला स्फोट (Rohini Court Bomb Blast) झाला होता. यामध्ये न्यायालयीन कर्मचारी किरकोळी जखमी झाले होते. त्यामुळे न्यायालय परिसरात खळबळ निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून तो डीआरडीओचा शास्त्रज्ञ आहे. वकिलाला मारण्यासाठी स्फोट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रोहिणी न्यायालयाच्या रुमनंबर 102 मध्ये ९ डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला होता. त्यानंतर न्यायालयात एकच खळबळ माजली होती. तसेच या स्फोटामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेज आणि काही माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार त्यांनी आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी डीआरडीओचा शास्त्रज्ञ असून त्याचा वकिलासोबत आधीच वाद होता. त्यामुळे वकिलाला मारण्यासाठी आरोपीने स्वतः आयईडी बॉम्ब तयार केला होता. आतापर्यंत फक्त शास्त्रज्ञाचे नाव पुढे आले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रोहिणी कोर्टात यापूर्वी झाला होता गोळीबार -

रोहिणी न्यायालयात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गोगी म्हणजेच जितेंद्र मान यांना पोलिसांनी सुनावणीसाठी रोहिणी येथील न्यायालयात आणलं होतं. त्याचवेळी काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गोगी यांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर ठार झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Van Accident : पुण्यात धक्कादायक अपघात! पोलीस व्हॅनने उडवल्या ७ गाड्या; CCTV व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : नागपुरात E20 विरोधात गडकरींच्या घरासमोर युवक काॅंग्रेस आक्रमक

Chandrakant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये दैवी गुण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

Pune News: पुणेकरांनो, अजून किती वाट पाहणार? PMRDA चे ३,९०६ कोटींचे प्रकल्प अजूनही रखडले, घोषणा फक्त कागदावरच..

Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

SCROLL FOR NEXT