pradeep kurulkar drdo scientist  
देश

DRDO Espionage Case : पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारे प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत कोठडी

रोहित कणसे

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारे पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. (DRDO scientist Pradeep Kurulkar to ATS custody)

नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी आज (९ मे) पार पडली. या प्रकरणात वकिलांनी तपासाचा प्रगती अहवाल सादर केला आहे. गेल्या ३-४ दिवसात विविध साक्षीदार तपासण्यात आले आणि काही नवीन माहिती देखील समोर आली आहे . तपास अधिकाऱ्यांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून काही रिकव्हर केलेला डेटा प्राप्त झाला आहे. म्हणजेच आरोपीच्या मोबाईलवरून काही डेटा डिलीट करण्यात आला होता. आरोपींवर केलेले आरोप गंभीर असल्याने सदर डेटा तपासणे आवश्यक असल्याचे न्यायाधीशांनी सांगितलं.

तसेच वरवर पाहता काही फोटो आणि काही डेटा आरोपीने परदेशी नागरिकासह शेअर केला आहे. आरोपीचे पद लक्षात घेता संवेदनशील डेटा शेअर करणे हे त्याच्याकडून राष्ट्रविरोधी कृत्य आहे असे म्हणता येईल असेही न्यायालयाने म्हटले आहे.

जर ही कृत्य देशाच्या हितासाठी आणि विशेषतः देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक असतील तर तपास सर्व बाजूने करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे कोठडीत तपास करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान पाकिस्तानसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या कुरूलकर यांना शुक्रवारी डीआरडीओच्या संचालक पदावरून बडतर्फ करण्यात आले.

नेमकं प्रकरण काय आहे?

कुरूलकर हे २०२२ पासून पाकिस्तानी एजेंट्सच्या संपर्कात होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) कुरुलकर यांना गोपनीयता कायद्याअंतर्गत पुण्यातून अटक केली होती. त्यांनी हनीट्रपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या महिली गुप्त एजेंटनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आरोपीशी संपर्क केला होता. तेव्हापासूनच व्हॉट्सअॅप मेसेज आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ते संपर्कात होते. एटीएस आधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत कुरुलकर यांनी महिलेशी व्हिडीओ चॅट केल्याचं मान्य केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT