Vikas Divyakirti 
देश

Vikas Divyakirti: 'चूक झाली, संपूर्ण देशाची माफी मागतो'; 'UPSC' विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर दिव्यकीर्तींनी सोडलं मौन

Vikas Divyakirti on IAS Coaching Centre Students deaths: दृष्टी IAS कोचिंग सेंटरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी मौन बाळगलं होतं. मात्र, एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयावर भाष्य केलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्लीच्या राजेंद्रनगमध्ये राव IAS स्टडी सर्कलच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना मृत्यू झाला होता. याप्रकरणी दृष्टी IAS कोचिंग सेंटरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी मौन बाळगलं होतं. मात्र, एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयावर भाष्य केलं आहे.

दिल्ली प्रशासनाने दिल्लीतील २९ कोचिंग सेंटरचे बेसमेंट सील केले आहे. त्यात मुखर्जीनगरमधील विकास दिव्यकीर्ती यांच्या दृष्टी आयएएस कोचिंगचा देखील समावेश आहे. यावर प्रतिक्रिया देताना दिव्यकीर्ती म्हणालेत ती, मला लक्ष्य केलं जात आहे कारण अशा प्रकरणामध्ये लोकांना कुणावर तरी दोषारोप करायचं असतं. कोणाला तरी बळीचा बकरा बनवायचं असतं.

MCD ने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिव्यकीर्ती यांनी दावा केलाय की, ते मंजुरी मिळालेल्या बिल्डिंगमध्येच काम करत आहेत. पण, मला जाणीव आहे की जी घटना घडली ती निष्काळजीपणामुळे घडली आहे. आमच्या हे डोक्यात आलं नाही. आम्ही यापुढे बेसमेंटमध्ये अशा प्रकारचे काम सुरु करणार नाही, असं ते म्हणाले.

यापुढे आम्ही फायर एक्झिट सुविधा नसलेली बिल्डिंग भाड्याने घेणार नाही. आमचा हेतू प्रामाणिक आहे. मी समजून घेण्यास कमी पडलो याबद्दल मी संपूर्ण देशाची आणि समाजाची माफी मागतो. चूक झालेली आहे आणि भविष्यात अशी चूक होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ, असं दिव्यकीर्ती म्हणाले.

दीड वर्षांपूर्वीच आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. एक विभागीय अधिकारी नेमला आहे. त्याचं काम बिल्डिंगच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याचं आहे. १६ पॉईट्स चेक करण्याचे काम ग्रुपच्या माध्यमातून केलं जातं. यात दरवाजे उघडे आहेत का? आपातकालीन स्थितीसाठी छतावरील दरवाजे उघडे आहेत का? अशा प्रकारच्या गोष्टी तपासल्या जातात, असंही त्यांनी सांगितलं.

दिव्यकीर्ती यांनी स्पष्ट केलं की, त्याच्या दृष्टी कोचिंग क्लासेसच्या प्रत्येक शाखेमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते. याशिवाय यापुढे बेसमेंटमध्ये काम चालणार नाही. जरी काम सुरु झालं तरी त्याठिकाणी फायर सेफ्टी एक्झिट असेल आणि आपातकालीन स्थितीसाठी पर्यायी मार्ग असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT