Accident News Esakal
देश

Accident News : ट्रकच्या अपघातात चालक, क्लिनर जखमी

क्लिनरला किरकोळ इजा असून त्यांना लगेच धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

सकाळ डिजिटल टीम

धानोरा : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव जवळ बेलगाव येथे मुख्य महामार्गावर अचानक साफ्ट तुटल्याने झालेल्या ट्रकच्या अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले. ही घटना सोमवार (ता. १३) दुपारी ३ वाजता घडली.

प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक यूपी ७१ एटी ५८१९ गडचिरोलीहून छत्तीसगड राज्याकडे जात असताना मुरूमगाव ग्रामपंचायतीअतंर्गत बेलगाव येथे शाफ्ट तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व अपघात झाला. यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे, तर क्लिनरला किरकोळ इजा असून त्यांना लगेच धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकाचे नाव सोहेल मोहम्मद अन्सारी, तर क्लिनरचे नाव गुपरान मोहम्मद अन्सारी दोघेही रा. आंबेडकरनगर, उत्तरप्रदेशचे आहेत. हे वाहन मुंबई येथील किस्मत खान यांच्या मालकीचे असल्याचे कळते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT