Driving Licence New Rules esakal
देश

Driving Licence New Rules : ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले, ३५ वर्षांनंतर सरकारचा मोठा निर्णय

नवे नियम मार्च महिन्यापासून लागू होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Driving Licence New Rules 2023 : नव्याने ड्रायव्हिंग लायसन्स बनवणाऱ्यांसाठी सरकारने नवे अपडेट जाहिर केले आहेत. याअंतर्गत तब्बल ३५ वर्षांनंतर ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या अंतर्गत ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक ऑटोमेटीक करण्यात येणार आहे. यामुळे ड्रायव्हिंग टेस्ट पास करणं थोडं कठीण होणार आहे. कारण ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमध्ये लागलेले सेंसर आणि सीसीटीव्हीच्या नजरेत टेस्ट घेतली जाणार होता.

अपघातात वाढ

ड्रायव्हिंग नीट न येणं तरीही ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं यामुळेच अपघातात वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. म्हणून हे नवे नियम बनवण्यात आले आहेत.

सध्या दिल्लीत ३ जानेवारीपासून मॅन्युअल ड्रायव्हिंग टेस्ट बंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी एंड आणि मार्च पहिल्या आठवड्यात ऑटोमेटेड सिस्टीमची सुरुवात करण्यात आली आहे.

काय आहेत बदल?

  • सरकारने लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये बदल केला गेला आहे.

  • नव्या नियमांनुसार लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या आधार कार्डमध्ये नोंद असलेल्या पत्त्याच्या जिल्ह्यात बनेल.

  • पण या निर्णयाने घाबरण्याचं कारण नाही. कारण यासाठी अर्ज कर्त्याला ऑनलाइन टेस्ट द्यावी लागेल.

  • याला आधार कार्ड लिंक करावं लागेल.

  • हा नवा नियम ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांसाठी आहे.

  • ड्रायव्हिंग टेस्टचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होईल.

  • ऑटोमेटेड ट्रायव्हिंग ट्रॅक मार्चमध्ये सुरु होईल.

  • यासाठी सेंसर आणि ओव्हरहेड कॅमेरे लावण्यात येणार आहे.

  • एका आठवड्यात ड्राय रन सुरु होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT