Drone Strikes Ship 
देश

Drone Strikes Ship: २० भारतीयांचा समावेश असलेल्या जहाजावर ड्रोन हल्ला; तटरक्षक दलाने साधला संपर्क

जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये २० भारतीयांचा समावेश असल्याचे समजते. सध्या भारतीय तटरक्षक दलाचे एक जहाज ‘एम.व्ही. केम प्लुटो’ या व्यापारी जहाजाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Drone Strikes Ship:

नवी दिल्ली: हिंदी महासागरातील भारताच्या सागरी हद्दीमध्ये अरबी समुद्रात इस्राईलशी संबंधित व्यापारी जहाजावर शनिवारी ड्रोन हल्ला झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून त्यामुळे या जहाजावर स्फोट होऊन आग देखील लागली होती. या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हल्ला करणारे ड्रोन नेमके कोणाचे होते? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

या जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये २० भारतीयांचा समावेश असल्याचे समजते. सध्या भारतीय तटरक्षक दलाचे एक जहाज ‘एम.व्ही. केम प्लुटो’ या व्यापारी जहाजाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या हे व्यापारी जहाज पोरबंदरच्या किनाऱ्यापासून २१७ नॉटिकल मैल अंतरावर आहे. हे व्यापारी जहाज तेलाची पिंपे घेऊन सौदी अरेबियातून मंगळुरुच्या बंदराकडे निघाले होते. ज्या भागामध्ये ही घटना घडली त्याची देखरेख करण्याची जबाबदारी ही ‘आयसीजीएस विक्रम’ या तटरक्षक दलाच्या जहाजाकडे सोपविण्यात आली होती. (Latest Marathi News)

या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर भारताचे हे जहाज तातडीने संबंधित व्यापारी जहाजाच्या दिशेने रवाना झाल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. या भागामध्ये असणाऱ्या अन्य सर्व जहाजांना हल्ला झालेल्या व्यापारी जहाजाची मदत करण्याच्या सूचना करण्यात आली आहे.

हल्ल्यानंतर आग लागली-

या ड्रोन हल्ल्यानंतर संबंधित व्यापारी जहाजावर आग भडकली होती त्यामुळे तिच्या तांत्रिक यंत्रणांवर परिणाम झाला, सुदैवाने यामध्ये कर्मचाऱ्यांना मात्र कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. तत्पूर्वी याच भागामध्ये सोमालियाच्या चाच्यांनी माल्टाच्या मालवाहू जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच हा हल्ल्याचा प्रकार उघड झाला आहे. भारतीय नौदलाच्या व्यापारी जहाजाशी संपर्क प्रस्थापित झाला असून तातडीने त्याच्या दिशेने मदत पाठविण्यात आली आहे.

आधी इराणकडून हल्ला-

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मागील महिन्यामध्ये इस्राईलच्या मालवाहू जहाजावर इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअर’ने हल्ला केला होता, अशी माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आता या ताज्या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे, हे मात्र चौकशीअंतीच स्पष्ट होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT