सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.त्यामूळे शिक्षित अशिक्षित उमेदवार तूमच्या दारासमोर येत असतील. आमदार असो वा कोणी मोठा नेता राजकारण हे असे क्षेत्र आहे जिथे दहावी पास लोकही आपले करीअर चांगले बनवू शकतात. पण, या सगळ्यात एक आशावादी चेहरा होता ज्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 20 पदव्या मिळवल्या होत्या.त्या अवलिया नेत्याचे नाव आहे डॉ.श्रीकांत जिचकर होय.
देशात सर्वात जास्त शिकलेला नेता म्हणून डॉ.श्रीकांत यांचेच नाव आजही आदराने घेतले जाते. आजवरचा त्यांचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. त्यांना भारतातील सर्वात शिक्षित व्यक्ती देखील म्हटले जाते.
डॉ.श्रीकांत यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५४ रोजी झाला. एमबीबीएस डॉक्टर म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. मग नागपुरातून एमडी केले. त्यानंतर त्यांची आयएएसमध्ये निवड झाली. दोन्ही वेळा त्यांनी या सरकारी नोकऱ्या नाकारल्या. जेव्हा ते आयपीएस झाले तेव्हा त्याच्याकडे 20 पेक्षा अधिक पदव्या होत्या. लिम्का बुकमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख भारतातील सर्वात जास्त योग्य असलेली व्यक्ती म्हणून केला आहे.
डॉ. श्रीकांत 1978 मध्ये भारतीय पोलीस सेवेत म्हणजेच आयपीएसमध्ये निवड झाली होती. त्यांनी त्या नोकरीवरही पाणी सोडले. ते पुन्हा भारतीय नागरी सेवा परीक्षेला बसले. यावेळी त्यांची आयएएस म्हणून निवड झाली. चार महिन्यांतच त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला. कारण, त्यांना राजकारणात नशिब आजमवायचे होते.
1980 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. वयाच्या २६ व्या वर्षी देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मानही त्यांना मिळाला. डॉ.श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यात (एलएलएम)चे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर डीबीएम आणि एमबीए (मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) केले. श्रीकांत यांनी पत्रकारितेचाही अभ्यास केला, पत्रकारितेची पदवी मिळवली. नंतर संस्कृतमध्ये डिलिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी मिळवली. जी विद्यापीठाची सर्वोच्च पदवी मानली जाते.
समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, इंग्रजी साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास, पुरातत्वशास्त्र आणि मानसशास्त्र या सर्व विषयात पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. या सर्व पदव्या त्यांनी गुणवत्तेवर राहून मिळवल्या हेही विशेष. शिक्षणादरम्यान त्यांनी अनेकवेळा सुवर्णपदके मिळवली. 1973 ते 1990 पर्यंत त्यांनी विद्यापीठाच्या 42 परीक्षा दिल्या.
श्रीकांत इथेच थांबले नाहीत तर ते महाराष्ट्राचे सर्वात शक्तिशाली मंत्रीही बनले. त्यांच्याकडे त्यावेळी 14 विभाग होते. तेथे त्यांनी 1982 ते 85 पर्यंत काम केले. पुढच्या वर्षी म्हणजे 1986 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. 1992 ते 1998 दरम्यान ते राज्यसभेवरही राहिले.
1999 मध्ये जेव्हा डॉ. जिचकार राज्यसभेची निवडणूक हरले तेव्हा त्यांनी आपले लक्ष प्रवासाकडे वळवले. ते देशाच्या अनेक भागात गेले आणि तेथे आरोग्य, शिक्षण आणि धर्म या विषयांवर भाषणे देत राहिले. युनेस्कोमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
श्रीकांत यांच्याकडे देशातील सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी होती. ज्यामध्ये 52000 हून अधिक पुस्तके होती. भारतातील सर्वात शिक्षित व्यक्ती म्हणून डॉ.जिचकार यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले. जिचकार हे शैक्षणिक, चित्रकार, व्यावसायिक छायाचित्रकार आणि अभिनयाचीही आवड होती. 1992 मध्ये त्यांनी शाळेची स्थापना केली. पुढे त्यांच्या आयुष्यात त्यांनी एकट्याने महाराष्ट्रात संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली आणि त्याचे कुलपती झाले.
जे लोक प्रतिभावान असतात ते अल्पायुषी असतात. हे श्रीकांतजींच्या बाबतीतही खरे ठरले. 02 जून 2004 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागपूरहून निघून मित्राच्या घरी निघाले असताना वाटेत त्यांची कार बसला धडकली. या अपघातात त्यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.