indigo flight  
देश

मद्यधुंद प्रवाशाचे विमानात गलिच्छ वर्तन, टॉयलेट बाहेरच...; परिस्थिती हाताळणाऱ्या एअर होस्टेसचं होतय कौतुक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : इंडिगोच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने पुन्हा घाणेरडे कृत्य केले आहे. गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या 6E 762 या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने भरपूर दारू प्यायली होती. विमान प्रवासादरम्यान हा प्रवासी टॉयलेटला जाण्यासाठी उठला. मात्र नशेच्या अवस्थेत त्याने विमानाच्या फरशीवरच उलट्या केल्या.

एवढेच नाही तर यानंतर त्याने टॉयलेटच्या बाहेर लघवी केली. तो इतका दारूच्या नशेत होता की, त्याला टॉयलेटच्या बाहेर लघवी केल्याचेही कळले नाही.

26 मार्च रोजी इंडिगो फ्लाइटमध्ये ही घटना घडली होती. मद्यधुंद प्रवाशाने उलट्या केल्यानंतर अशा वातावरणात इतर प्रवाशांना बसणे अत्यंत कठीण झाले होते. त्यामुळे ऑन-बोर्ड एअरहोस्टेसला विमानाच्या फरशीवर पडलेली उलटी पुसावी लागली.

याआधी एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने वृद्ध सहप्रवाशावर लघवी केल्याची घटना घडली होती.

ही घटना गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. यानंतर त्यांनी या घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार हातळणाऱ्या एअर होस्टेसचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 24 तासांत 3.90 TMC पाण्याची आवक! 67 टीएमसीचा टप्पा पार, महाबळेश्वर-नवजात मुसळधार; पाहा आजची ताजी आकडेवारी

जितेंद्र यांनी विकत घेतलेला 4.25 लाखांना बंगला, आज त्याची किंमत 450 कोटी, जितेंद्र यांची मास्टरस्ट्रोक डील

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT