Childrens admitted in Hospitals 
देश

मेंदूज्वरामुळे बिहारमध्ये 97 मुले दगावली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बिहार राज्यात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले असताना आता मेंदूज्वरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत मेंदूज्वर (एन्सेफलायटीस) मुळे सुमारे 97 मुले दगावली असून 146 मुलांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुजफ्फरपूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी शैलेश प्रसाद सिंह दिली आहे. 

"रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत नाहीत. जर चांगल्या सुविधा मिळाल्या असत्या, तर दगावलेली लहान मुले वाचू शकली असती,'' असे एका रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. तर आजारी मुलांवर शक्य तेवढे उपचार केले जात असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

मेंदूज्वरामुळे मेंदूला सूज येते, ज्यामुळे रुग्णाला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. ताप येणे, उलट्या होणे, झटका येणे, पक्षाघात आणि कोमा ही लक्षणे मेंदूज्वर झाल्याचे दर्शवितात. शिशु आणि वृद्ध लोकांना मेंदूज्वर होण्याचे प्रमाण जास्त आहे. पाच वर्षांपूर्वीही बिहारमध्ये 380 जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT